आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:अमेरिकेने बनवला होता शक्तिशाली बाॅम्ब; या बाॅम्बच्या स्फोटाने रिश्टर स्केलवर 5 तीव्रतेचा भूकंप, जगभरात हादरे शक्य

मॉस्को3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेच्या कॅसल ब्राव्होला टक्कर देण्यासाठी रशियाने सात वर्षांत बनवला सार बॉम्ब

रशियाने सर्वात शक्तिशाली आण्विक बाॅम्ब सार बॉम्ब तयार करण्यामागे कारण आहे अमेरिका. १९५४ मध्ये अमेरिका व सोव्हिएत संघामध्ये शीतयुद्ध पेटले होते. तत्कालीन सोव्हिएत संघाने अमेरिकेच्या थर्मोन्यूक्लियर डिव्हाइस कॅसल ब्राव्होला टक्कर देण्यासाठी हा बाॅम्ब तयार केला होता.

तेव्हा अमेरिकेने डिव्हाइसची मार्शल आयलँडवर चाचणी घेतली होती. हे उपकरण १५ मेगाटन वजनी होते. तत्कालीन परिस्थितीत ते सर्वाधिक शक्तिशाली मानले गेले. सोव्हिएत संघाला त्याची माहिती मिळताच त्याने अमेरिकेला टक्कर देण्याचा निर्णय घेतला. या आण्विक बाॅम्बला पहिल्यांदा रेल्वेद्वारे आेलेन्या हवाई तळावर नेण्यात आले. तेथे त्यास लांब पल्ल्याच्या हल्ल्यासाठी सक्षम टीयू-९५ वर लादण्यात आले. ३० ऑक्टोबर १९६१ रोजी बाॅम्बरने उड्डाण घेतले. तेव्हा ते ९६५ किमी अंतर जाऊन सेवेर्नी बेटावर पोहोचले. हे बेट आर्क्टिक भागात आहे.

बाॅम्बरने बाॅम्बफेक केली. त्यात एक पॅराशूट होते. त्यातून बाॅम्ब हळूहळू पृथ्वीवर कोसळले. विमानाला दूर जाण्यासाठी अवधी मिळाला. हा बाॅम्ब जमिनीपासून १३ हजार फूट उंचीवर होता. तेव्हा स्फोट घडवण्यात आला. या बाॅम्बच्या स्फोटाने रिश्टर स्केलवर ५ तीव्रतेचा भूकंप येतो. जगभरात त्याचे हादरेदेखील अनुभवता येतात. या स्फोटानंतर अमेरिका व रशियाने १९६३ मध्ये एका करारावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर दोन्ही देशांनी हवेत अणुबाॅम्बच्या चाचणीवर पूर्णपणे बंदी घातली.

कॅमेऱ्याला ठेवले होते शेकडो मैल दूर

या बाॅम्बची भीती प्रचंड होती. त्यामुळे प्रयोगाच्या वेळी कॅमेऱ्याला शेकडो मैल दूर ठेवण्यात आले होते. ते लो लाइट पोझिशनमध्ये ठेवण्यात आले होते. कारण आण्विक स्फोटाच्या प्रकाशामुळे कॅमेरे खराब होण्याची भीती होती. या शक्तिशाली कॅमेऱ्यांनी ४० सेकंदांपर्यंत आगीच्या गोळ्याचे व्हिडिआे बनवले. त्यानंतर ते मशरूमसारख्या ढगात रूपांतरित झाले.