आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ आणि इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी गुरुवारी युक्रेनची राजधानी कीव्ह येथे दाखल झाले. या सर्व नेत्यांनी सर्वप्रथम कीव्हच्या त्या भागांना भेट दिली, जिथे रशियाने हल्ले सुरू केले आहेत. यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. यानंतर नाटो लवकरच युक्रेनला मोठी मदत करेल, असे सांगितले जात आहे. मात्र, ते कोणत्या स्वरुपात असेल, याबाबत तूर्तास खुलासा करण्यात आलेला नाही.
युक्रेनला मिळू शकते चांगल्या दर्जाचे हत्यार
'न्यूयॉर्क टाईम्स'च्या वृत्तानुसार, नाटो देश रशियाचा मुकाबला करण्यासाठी युक्रेनची चांगल्या शस्त्रांची मागणी लवकरच पूर्ण करू शकतात. एप्रिलमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनीही कीव्हला भेट दिली होती. असे मानले जाते की नाटो देश प्रथम युक्रेनला 6 ट्रक-लाँच केलेले विशेष हॉवित्झर युनिट देऊ शकतात. फ्रान्सने युक्रेनला यातील 12 युनिट आधीच दिले आहेत. या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामुळे रशिया हैराण झाला असून त्यामुळे त्याला दक्षिण युक्रेनमधील खेरसन येथे धडक द्यावी लागली आहे.
युक्रेनचे रक्षण करा
कीव्हमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मॅक्रॉन म्हणाले- आम्ही इकडे आल्यावर जमिनीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. युक्रेन आपल्या अस्तित्वासाठी लढत आहे. त्याचं स्वातंत्र्य आणि अस्तित्व वाचवण्याची जबाबदारीही आपली आहे. हे आमचे ध्येय आहे आणि ते साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
पुढे मॅक्रॉन म्हणाले - युक्रेनला EU सदस्यत्व मिळण्यात कोणतीही अडचण नाही, परंतु यासाठी नियम आहेत आणि आम्ही लवकरात लवकर युक्रेनला प्रथम EU सदस्यत्व मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. असे देखील त्यांनी सांगितले.
रशियाने युक्रेनच्या पूर्वेकडील लिसिचान्स्क राज्यावर हल्ले सुरुच आहेत. सेवेरोडोनेत्स्क हे येथील महत्त्वाचे शहर आहे. रशियन सैन्याने या शहराकडे जाणारे सर्व पूल उडवून दिले आहेत. आता इथले लोक शेतातून आणि कालव्यांमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, काही रेल्वे मार्गही खुले आहेत. विशेष म्हणजे रशियन सैन्य तीन दिवसांपासून 18 किलोमीटर अंतरावर अडकले आहे. युक्रेनचे सैन्य सर्व शक्तीनिशी त्याचा मुकाबला करत आहे.
आतापर्यंत 10 हजार लोकांनी सोडले शहर
पूर्वेकडील पुरवठा साखळी खंडित व्हावी म्हणून हे शहर कसेतरी काबीज करण्याचा रशियाचा पुरेपूर प्रयत्न आहे. याआधी त्यांना हे काम फार अवघड वाटत नव्हते, पण आता हे टार्गेट खूप अवघड वाटत आहे. युक्रेनने येथे अवजड शस्त्रे तैनात केली आहेत. आतापर्यंत 10 हजार लोक हे शहर सोडून गेले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.