आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Prime Minister Of The UAE Updates: His Bought 1 Lakh Acres Of Land In The Affluent Areas Of Britain; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:यूएईच्या पंतप्रधानांनी ब्रिटनच्या सुखवस्तू भागात 1 लाख एकर जमीन खरेदी केली; सर्वात मोठे जमीनदार झाले, विकणाऱ्यांत राजघराणेही

लंडन9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेख मोहंमद यांची ब्रिटनमध्ये गेल्या 9 वर्षांत घोड्यांच्या शर्यतीत 6000 कोटी रुपयांची गुंतवणूक
  • ब्रिटनमधील घोडे शर्यत उद्योगही पूर्णपणे शेख यांच्यावर अवलंबून

ब्रिटनमध्ये सरकार भलेही राजघराण्याचे असले तरी तेथील बहुतांश जमिनीचा मालक दुसरीच व्यक्ती आहे. ते आहेत दुबईला जगातील सर्वात सुंदर शहर बनवणारे आणि यूएईचे उपराष्ट्रपती व पंतप्रधान शेख मोहंमद बिन रशीद अल मख्तूम. त्यांच्याकडे ब्रिटनमध्ये ४० हजार हेक्टर म्हणजे सुमारे १ लाख एकर जमीन आहे. ते तेथील सर्वात मोठे जमीनदार झाले आहेत. ‘द गार्डियन’ या ब्रिटिश वृत्तपत्राने हा खुलासा केला आहे. शेख मोहंमद यांच्याकडे लंडनच्या सर्वात महाग आणि सुखवस्तू भागात भव्य हवेली, मॅन्शन, न्यू मार्केटसारख्या भागात तबेला आणि प्रशिक्षण केंद्रही आहे. त्याशिवाय स्कॉटिश हायलँडमध्येही सुमारे २५,००० हेक्टर जमीन आहे.

आश्चर्याची बाब ही की शेख तर ब्रिटनमध्ये धडाक्यात महाग जमीन खरेदी करत आहेत, पण येथे किमतीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे राजघराणेही त्यांना आपली जमीन विकत आहे. ब्रिटनच्या उच्चभ्रू लोकांमध्ये आपला दबदबा निर्माण करण्यात शेख यांनी घोड्यांच्या शर्यतीत केलेल्या गुंतवणुकीचा मोठा वाटा आहे. वर्ष २०११ ते २०२० दरम्यान शेख यांनी नुसत्या घोड्यांच्या शर्यतीत ६००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्याचा अर्थ असा की, संपूर्ण न्यू मार्केटचे क्षेत्र आणि ब्रिटनमध्ये खेळला जाणारा हा खेळ, दोन्ही शेख यांच्यावर अवलंबून आहे. अरात इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनीमार्फत शेख यांनी न्यू मार्केट भागातील जमिनीचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग खरेदी केला आहे.

न्यू मार्केटच्या आजूबाजूला १०० पेक्षा जास्त मालमत्तांचा घोड्यांच्या शर्यतीशी काहीही संबंध नाही, पण त्यावर शेख यांची मालकी आहे. वर्ष २०१९ मध्ये जॉकी क्लबने महाराणी एलिझाबेथ यांच्या प्रतिमेसह शेख यांच्या सन्मानार्थ त्यांचे पोर्ट्रेटही जारी केले. रेसिंग एम्पायर निर्माण केले, अशा शब्दांत लोकांनी शेख यांचे आभार मानले. शेख यांनी वर्ष १९८१ ते २०१५ च्या दरम्यान शेकडो एकरमध्ये विस्तारलेली मालमत्ता खरेदी केली आहे, तिची किंमत १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यात ड्यूक यांची शाही मालमत्ता, ऐतिहासिक माल्टन पॅडॉक्स आणि रटलँड हाऊसचाही समावेश आहे.

शेख यांचे वकील म्हणाले- कर चोरी केली नाही, कायद्यानुसार मालमत्तांची खरेदी
‘गार्डियन’ला ब्रिटनमधील शेख यांच्या जमीन-मालमत्तांचा पूर्ण तपशील मिळाला नाही. कारण त्यांची बहुतांश संपत्ती सरकारी रेकॉर्डमध्ये प्राप्तिकराच्या कारणास्तव विविध कंपन्यांच्या नावावर आहे. तथापि, शेख यांच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, आम्ही जी गुंतवणूक केली आहे त्यात कुठेही कर चोरी झालेली नाही. कारण, संपूर्ण खरेदी कायद्यानुसार झालेली आहे.

बातम्या आणखी आहेत...