आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍वप्‍नपूर्ती:सातव्या वर्षी नाटकात पंतप्रधानांची भूमिका!

ब्रिटनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा िदल्यानंतर ब्रिटनला नवीन पंतप्रधान मिळाले. लिझ ट्रस देशाच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान असतील. त्यांनी भारतवंशीय ऋषी सुनक यांचा पराभव केला.ट्रस यांच्याबद्दल जाणून घेऊया.

{कोण आहेत ट्रस? ४७ वर्षीय ट्रस यांचा जन्म इंग्लंडच्या ऑक्सफर्डमध्ये झाला होता. ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. काँझर्व्हेटिव्ह पार्टीत सामील होण्याच्या आधी त्या डाव्या संघटनेसाठी काम करत होत्या. २०१० मध्ये त्या पहिल्यांदा खासदार झाल्या. २०१४ मध्ये डेव्हिड कॅमरून यांच्या सरकारमध्ये लिझ ब्रिटनच्या सर्वात तरुण मंत्री झाल्या. त्यानंतर त्या थेरेसा मे व बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातही होत्या. सुरुवातीच्या काळात एका काँझर्व्हेटिव्ह नेत्यासोबतच्या अफेअरमुळे चर्चेत राहिल्या. हे नेते त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे होते. लिझ यांना दोन मुली आहेत. ट्रस यांना पराभव आवडत नाही. लहानपणी खेळात पराभव दिसताच त्या पळून जात. त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी नाटकात तत्कालीन पंतप्रधानंाची भूमिका साकारली होती.

{ट्रस आल्यामुळे ब्रिटनमध्ये काय परिवर्तन होईल? लिझ पंतप्रधानपदासाठी निवडल्या जाणे याकडे जॉन्सन यांचे शासन पुढच्या टप्प्यात नेणे असे बघितले जात आहे. दोन्ही एकाच पक्षाचे नेते आहेत. त्याशिवाय दोन्ही नेत्यांचे देशांतर्गत तसेच परराष्ट्र प्रकरणांत सारखे विचार आहेत. लिझ नागरिकांसाठी कर कपात करण्याच्या बाजूने आहेत. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल, असे त्यांना वाटते. ब्रिटनला महागाईच्या झळा बसणार नाहीत, यासाठी योग्य ती काळजी घेणे हेच लिझ यांच्यासमोरील मोठे आव्हान असेल.

{ब्रिटनची प्रतिमा जगभर कशी बदलेल? ही शक्यता कमी वाटते. कारण त्या आधीच ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री होत्या. जगभरातील नेत्यांसाठी हा चेहरा नवा नाही. परंतु त्या अमेरिका, भारत व इतर देशांसोबतचे चांगले संबंध कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. ब्रेक्झिटच्या कट्टर विरोधक व ब्रिटनने युरोपीय संघात राहावे, याच्या त्या समर्थक आहेत.

{ऋषी सुनक पुढे काय करतील? ऋषी सुनक खासदार म्हणून काम करतील. ट्रस यांनी एखाद्या पदाचा प्रस्ताव दिल्यास जरूर विचार करू अशी प्रतिक्रिया सुनक यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...