आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळ संसदीय निवडणूक:भारत समर्थक शेरबहादूर देऊबांची काँग्रेस निवडणुकीत आघाडीवर

काठमांडू8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेपाळच्या संसदीय निवडणुकीत भारत समर्थक पंतप्रधान शेरबहादूर देऊबा यांचा सत्ताधारी पक्ष नेपाळी काँग्रेस आघाडीवर आहे. बुधवारी जाहीर निकालातून हे स्पष्ट झाले आहे. देऊबा त्यांचा गृह जिल्हा धनकुटामधील दादेलधुरा मतदारसंघातून सलग सातव्यांदा विजयी झाले. निवडणुकीतील काैल चीनसाठी धक्कादायक आहे.सत्ताधारी नेपाळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. सत्ताधारी आघाडी जवळपास ७५ जागी विजयी हाेण्याची शक्यता आहे. कारण मतमाेजणीत सत्ताधाऱ्यांनी आघाडी घेतली आहे. आघाडीतील पुष्पकमल दहल यांच्या सीपीएन-एमसीला १७ जागा मिळू शकतात. यूएस व लाेकशाही समाजवादी पार्टीला प्रत्येकी दाेन जागी विजय मिळू शकताे. के.पी. शर्मा ओली यांच्या पक्षाला (सीपीएन-यूएमएल) तीन जागा मिळाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...