आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Question Of The Relatives Of The Victims Of The Attack Look At These Photos, Tell Me Were They Terrorists?; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:हल्ल्यातील पीडितांच्या नातेवाइकांचा प्रश्न - हे फोटो बघा, सांगा- हे दहशतवादी होते का?

काबूल22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काबूलमधील हल्ल्यात 7 मुलांसह 10 जणांचा मृत्यू

अमेरिकेने ड्राेन हल्ल्यातून इस्लामिक स्टेट खुरासानला लक्ष्य केल्याचा दावा केला हाेता. त्यात एकाच कुटुंबातील १० जणांना प्राण गमवावे लागले. मृतांत सात मुलांचा समावेश आहे. मृतांमध्ये एक अमेरिकन सैन्याला मदत करणाऱ्यांपैकी हाेता. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी एकाच्या नातेवाईक म्हणाले, हल्ल्यात मुले मारली गेली. त्यात दाेन वर्षीय दाेन मुली हाेत्या. ही छायाचित्रे बघा आणि सांगा ही मुले दहशतवादी हाेती का हाे? त्यामधील एक मुलगी मलिकाचे अवशेष घराबाहेरील ढिगाऱ्यात आढळून आले. मुलगी वाहनात हाेती असे आपण कसे स्वीकारायचे?

भावाच्या मृत्यूमुळे दु:खी तरुण म्हणाला, आमचे कुटुंब अतिशय साधारण आहे. आयएस खुरासानशी तर दूरदूरपर्यंत संबंध नाही. माझा भाऊ घरात राॅकेट हल्ल्यात मारला गेला. साेमवारी दिवसभर रुग्णालयात नातेवाइकांनी अवशेषांची आेळख पटवली. ते एक-एक अवशेष घेऊन नाव लिहिलेल्या मृतपेट्यांत ठेवत हाेते. दाेन वर्षांची सुमाया व मलिकाच्या नावे मृतपेट्या ठेवल्या हाेत्या. नंतर त्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. त्या वेळी ते लाेक अमेरिकेच्या विराेधात घाेषणा देत हाेते. संयुक्त लष्कर स्टाफ मेजर जनरल विल्यम टेलर यांनी ही घटना गंभीर असल्याचे म्हटले आहे. रविवारी काबूलमध्ये हल्ल्यानंतर अमेरिकेने स्फाेटकांचे वाहन उडवल्याचा दावा केला हाेता.

बातम्या आणखी आहेत...