आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेने ९/११ हल्ल्यानंतर जगभरात अनेक युद्धे केली. त्यात सुमारे ३.७० कोटी लोकांना बेघर होण्याची वेळ आली. ब्राऊन विद्यापीठाच्या कॉस्ट ऑफ वॉर प्रोजेक्टच्या ताज्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. या अहवालात ११ सप्टेंबर २००१ पासून आतापर्यंतच्या युद्धाच्या परिणामासंबंधीचे आकडे देण्यात आले आहेत. दुसऱ्या महायुद्धाला सोडल्यास हा आकडा सन १९०० नंतरच्या कोणत्याही संघर्षामुळे झालेल्या स्थलांतरापेक्षा जास्त आहे. अमेरिकेची दहशतवादाच्या विरोधातील युद्धाची सुरुवात करण्याच्या मोहिमेची १९ वर्षे पूर्ण झाली. त्याच वेळी हा अहवाल जारी झाला. ७ ऑक्टोबर २००१ अफगाणिस्तानात दहशतवाद्यांच्या विरोधातील लढाई सुरू झाली होती. अहवालात अफगाणिस्तान, इराक, पाकिस्तान, येमेन, सोमालिया, फिलिपाइन्स, लिबिया, सिरियामधून स्थलांतरित झालेल्या लोकांची संख्या सांगण्यात आली आहे. आकडा ५ ते ६ कोटींपर्यंत असू शकतो. कारण लहान मोहिमांतील देशांमध्ये विस्थापित झालेल्या लोकांची संख्या समाविष्ट नाही. बुर्किना फासो, कॅमरून, चाड, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, माली, नायजेरिया इत्यादी देशांतील संख्या त्यात नाही. अहवालाचे प्रमुख लेखक व अमेरिकन विद्यापीठाचे प्रोफेसर डेव्हिड वाइन म्हणाले, विस्थापन हानीच्या मोठ्या कारणांपैकी आहे. युद्धामुळे असंख्य लोकांना प्राण गमवावे लागले. हवाई बॉम्बफेक, ड्रोन हल्ले इत्यादी कारणांमुळे अनेक लोकांना घर सोडावे लागले. अनेक देशांतील लढाई दोन दशकांपर्यंत चालली.
ट्रम्प यांच्या शासनकाळात विस्थापितांना अमेरिकेत सर्वात कमी आश्रय
अमेरिकेने विस्थापितांना आश्रय दिला आहे. व्हिएतनाम लढाईनंतर सुमारे १० लाख लोकांना साऊथ कॅलिफोर्निया येथील छावण्यात ठेवण्यात आले. वास्तविक अलीकडच्या वर्षांत स्थलांतरितांच्या संख्येत घट झाली. ट्रम्प पदावर विराजमान झाल्यापासून संख्येत घट झाली. जानेवारी २०१७ ते २,९५५ इराकचे २ हजार ७०५ सोमालिया नागरिक येथे आश्रयाला आहेत. हे प्रमाण आेबामा यांच्या कार्यकाळाच्या तुलनेत ९०-९५ टक्के कमी आहे. छायाचित्र सोमालियातील स्थलांतरितांच्या छावणीचे आहे. येथे देशाची ४६ टक्के लोकसंख्या आश्रयाला आली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.