आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • The report claims that the malaria drug does not prevent corona infection research on 821 people who came in contact with patients

विषाणूचा उपचार :मलेरियाचे औषध कोरोनाचा संसर्ग रोखत नसल्याचा अहवालात दावा, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 821 जणांवर संशोधन

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • मिनेसोटा व कॅनडा विद्यापीठाचे दावे ट्रम्प यांच्यापेक्षा वेगळे
  • यश : बरे झालेल्या रुग्णाच्या अँटिबॉडीतून बनवले औषध, चाचणी सुरू

मलेरियाचे औषध हायड्रोक्सीक्लोरोक्वीन कोरोनाचा संसर्ग रोखू शकत नाही. मिनेसोटा आणि कॅनडा विद्यापीठाच्या संशोधकांनी एका अभ्यासात हा दावा केला आहे. हे संशोधन ८२१ जणांवर करण्यात आले. ते सर्व काेरोना रुग्णांच्या संपर्कात आले होते. यात आरोग्य कर्मचारी, कुटुंबीय आदींचा समावेश आहे. हायड्रोक्सीक्लोरोक्वीनवर ही सर्वात पहिली वैद्यकीय चाचणी मानली जात आहे.

ही चाचणी अमेरिका आणि कॅनडा प्रशासनाच्या मदतीने करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सांगत असतात की, हायड्रोक्लोरोक्वीनने संसर्ग रोखता येऊ शकतो, यामुळे ते त्याचे सेवन करतात, यामुळे त्याला महत्त्वाचे मानले जात आहे. संशोधकांच्या पथकाचे प्रमुख डॉ. डेव्हिड आर. बोलवारे यांनी सांगितले की, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन संसर्ग रोखण्यात सक्षम नाही. ज्या लोकांवर संशोधन करण्यात आले ते कोरोना रुग्णापासून ६ फुटांपेक्षा कमी अंतरावर १० मिनिटे राहिले होते. या लोकांना मास्क आणि फेस शील्डदेखील लावले नव्हते.

खुलासा : ट्रम्प यांनी २ आठवडे घेतले मलेरियाचे औषध, नजर ठेवल्याचे व्हाइट हाऊसचे म्हणणे

व्हाइट हाऊसच्या डॉक्टरांच्या पथकाने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दोन आठवडे मलेरियाचे औषध हायड्रोक्सीनक्लोरोक्वीन घेतले. या काळात आम्ही त्यांच्या प्रकृतीवर जवळून लक्ष ठेवून होतो. पथकाचे सदस्य डॉ. सीन कॉनले यांनी ट्रम्प यांच्या नव्या वैद्यकीय अहवालात सांगितले की, राष्ट्राध्यक्ष ठणठणीत आहेत, त्यांच्यावर दुष्परिणाम झाला नाही. १६ महिन्यांपूर्वीच्या तुलनेत ट्रम्प यांच्या आरोग्यात किरकोळ बदल झाला. केवळ त्यांचे एक पाउंड वजन वाढले.


निर्णय : ट्रम्प प्रशासनाने व्हॅक्सिन कँडिडेटसाठी ५ कंपन्यांची निवड केली

ट्रम्प प्रशासनाने कोरोनाच्या व्हॅक्सीन कँडिडेटसाठी ५ कंपन्यांची निवड केली आहे. या कंपन्यांमध्ये मॅसाच्युसेट्सची मॉडेर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन, मर्क अँड फायझर आणि ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राजेनेका ग्रुपचा समावेश आहे. राष्ट्रपती ट्रम्प यांना देशात कोरोनाची लस लवकर बनवायची आहे. यासाठी मॉडेर्ना, जाॅन्सन अँड जॉन्सन आणि ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राजेनेका यांना १६६१० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. अमेरिकेत कोरोनाचे १९०२७७९ रुग्ण आहेत, तर १०९१५९ मृत्यू झाले आहेत.

यश : बरे झालेल्या रुग्णाच्या अँटिबॉडीतून बनवले औषध, चाचणी सुरू

अमेरिकेतील अॅली लिली कंपनीचा दावा आहे की, त्यांनी बरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या अँटिबॉडीतून औषध बनवले. यामुळे इतर रुग्ण बरे होऊ शकतात. औषधाची चाचणी सुरू आहे. त्याला एलवाय-सीओव्ही ५५५ नाव दिले आहे. अॅली लिलीने यासाठी सेल्लेरा बायोलॉजी कंपनीची मदत घेतली आहे. मार्चमध्ये दोन्हींमध्ये करार झाला होता. चाचणीच्या पहिल्या टप्प्यात औषधाची सुरक्षा व तिच्या रुग्णांच्या सहन करण्याच्या क्षमतेची माहिती घेतली जाईल. चाचणी सफल राहिल्यास ते बाजारात आणणार. रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेतल्याच्या केवळ ३ महिन्यांत औषध तयार करण्यात आले आहे. यामुळे कोरोनाचे स्पाइक प्रोटीनची संरचना निष्क्रिय केली जाऊ शकते. कोरोना शरीराच्या सुदृढ कोशिकांपर्यंत जाऊ शकणार नाही तसेच नुकसानही करणार नाही.

0