आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Republican Party's Nod To Garcetti's Appointment As US Ambassador To India, Backed By President Biden, Has Not Materialized

नियुक्ती अधांतरी:भारतात गार्सेटींच्या अमेरिकी राजदूत नियुक्तीत रिपब्लिकन पक्षाचा खोडा, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा पाठिंबा, मात्र मूर्त स्वरूप नाही

रोहित शर्मा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात अमेरिकेचा कायम राजदूत दोन वर्षांपासून काळ नाही. नवी दिल्ली स्थित अमेरिकी दूतावासात एवढा काळ स्थायी राजदूत नसणे हे प्रथमच घडत आहे. मात्र, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी लॉस एंजलिसचे माजी महापौर एरिक गार्सेटींना राजदूताच्या रूपात नियुक्त करण्याची घोषणा ५६७ दिवसांपूर्वी झाली आहे. व्हाइट हाऊसनेही त्यांचे समर्थन केले आहे.मात्र, त्यांची नियुक्ती होणार की नाही हे स्पष्ट नाही. गेल्या २ वर्षांत सकनेटर प्रश्न उपस्थित करत आहेत की, गार्सेटींना त्यांचे वरिष्ठ सल्लागार रिक जॅकब्जविरुद्ध लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची माहिती कशी नाही. खासदार चक ग्रासले यांच्या कार्यालयात तपासकर्त्यांनी या आरोपाचा तपासही केला होता. व्हिसलब्लोअर आयोवा रिपब्लिकनच्या संपर्कात आले तेव्हा नवी दिल्लीत गार्सेटी यांच्या राजदूताच्या रूपातील तैनाती गेल्या वर्षअखेरपर्यंत अडचणीत आली.अन्य सिनेटर्सनी सांगितले की, बायडेन प्रशासन गार्सेटी राजदूत होतील अशी अपेक्षा बाळगून असले तरी या प्रकरणाची सुनावणी झाली पाहिजे. तीन डेमॉक्रॅटिक सिनेटर्सच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, गार्सेटींबाबत संशय आहे. सिनेटर किस्टन सिनिमा, सिनेटर मार्क केलींनी सांगितले, मला गार्सेटींची चिंता आहे. सिनेटमध्ये डेमॉक्रॅटिक पार्टीशिवाय रिपब्लिकन सिनेटर्स गार्सेटींना राजदूताच्या रूपात हिरवी झेंडी दाखवू शकतात. पक्षाला या मुद्द्यावर ५० सिनेटर्सशिवाय सेन सिनिमांचीही साथ मिळू शकते. मात्र, डेमॉक्रॅटिक सिनेटर्सची चिंता पुढील जटिल समस्येबाबत आहे. तपास पूर्ण होईपर्यंत नामांकन प्रक्रिया पुढे जाऊ नये, असे रिपब्लिकन म्हणत आहेत.

राजदूत नसल्यास मुद्दे रखडलेले गार्सेटी यांची नियुक्ती न झाल्यामुळे भारतातील अनेक प्रकरणे सुटू शकत नाहीत. तज्ज्ञांनुसार, राजदूताला महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्थानिक लोकांना दृष्टिकोनाची समज असते. यामुळे दोन्ही देशांतील वाद सोडवण्यास मदत मिळू शकते. त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांत राजदूताच्या कमतरतेमुळे व्यावसायिक अडचणी येऊ शकतात. धोरण पुढे नेण्यातील अडचणी यामुळे येत आहेत.

नवे व्हाइट हाऊस प्रमुख सोबत गार्सेटींना व्हाइट हाऊसचे नवे “चीफ ऑफ स्टाफ’ जेफ जेंट्सचे समर्थन मिळण्याची शक्यता आहे. भास्करच्या सूत्रांनुसार, जेफ ओबामा प्रशासनादरम्यान जेकब्जचे जवळचे मित्र होते. जेकब वाॅशिंग्टनला आले होते तेव्हा जेफ यांच्यासोबत होते.

५० देशांत राजदूत नाहीत चीनची आक्रमकता रोखण्यासाठी स्थायी राजदूत आवश्यक आहे. तज्ज्ञांनी राजदूत नियुक्ती प्रलंबित राहण्यासाठी राजकीय मरगळीस जबाबदार ठरवले आहे. सौदी अरेबिया, कुवेत, कतार व यूएईसह ५० देशांत अमेरिकेचे स्थायी राजदूत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...