आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्वासोच्छ्वासाला त्रास:काेरोना संकटाच्या काळात चांगल्या आरोग्यासाठी श्वास घेण्याची पद्धतही सुधारणे गरजेचे

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दररोज २५ हजार वेळा श्वास घेतो आपण

जगभरात कोरोना संसर्गाची सुरुवात श्वासोच्छ्वासाला त्रास होत असल्याच्या अडचणीवरून झाली होती. आता संसर्गाला रोखण्यासाठी प्रदीर्घ काळ मास्कची सवय करून घ्यावी लागणार आहे. परंतु, मास्कमुळे अनेक लोकांना सामान्य श्वासोच्छ्वास क्रिया करण्यात त्रास जाणवत आहे. त्यावरून ते चिंतीत आहेत. मात्र, चिंता करण्याची मुळीच गरज नाही. कारण लस तयार होईपर्यंत आपल्याला असेच राहावे लागणार आहे. त्याचबरोबर आरोग्यालाही सांभाळावे लागणार आहे. ब्रुकलिनमध्ये सायकलवरून लोकांचे वागणे न्याहाळतो तेव्हा मला अनेक चुकीच्या गोष्टी दृष्टीस पडतात. लोक मास्क लावतात. पण, तो त्यांच्या गळ्यात लटकलेला असतो. एखादा दुसरा व्यक्ती त्यांच्याजवळून जाताे. तेव्हाच ते मास्क लावतात.

मास्कमुळे मोकळेपणाने श्वास घेण्यात अडचण येते, अशी त्यांची सबब असते. वास्तविक अशा वागण्यामुळे ते स्वत:च्या आरोग्याशी खेळत आहेत. मांसपेशी, मेंदू व इतर अवयवांना पुरेशा प्रमाणात प्राणवायू पोहोचतो का? मग मास्क खरोखरच अडथळा ठरत असावा का? त्यामुळे आपली श्वास घेण्याची प्रक्रिया किती प्रभावी आहे, हे जाणूून घेणे महत्त्वाचे ठरते. कामाच्या ठिकाणी पूर्णवेळ मास्क लावून राहावे लागते. अशा लोकांसाठी ही माहिती निश्चित महत्त्वाची ठरते. श्वासासंबंधी अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार लोक श्वासोच्छ्वास चुकीच्या पद्धतीने करतात. ‘ब्रिथ : द न्यू सायन्स ऑफ ए लॉस्ट आर्ट’ या नव्या कोऱ्या पुस्तकाचे लेखक डॉ. जेम्स नेस्टर म्हणाले, आपण सामान्यपणे श्वास घेत आहोत, असे आपल्या सर्वांना वाटते. परंतु, श्वास घेण्याचा खरा अर्थ जाणून घेतला पाहिजे. बहुतांश लोक तर तोंडाने श्वास घेताहेत. त्यातून शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. नाकाने पूर्ण श्वास घ्यावा. त्यातून संप्रेरके व नायट्रेट अॅसिड जास्त स्रवतो. त्यातून रक्तदाब नियंत्रित ठेवणे व शरीराला पुरेसा ऑक्सिजनही मिळतो, असे तज्ञांचे म्हणणे आहे. आता मास्क आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे शरीराराला जास्तीत जास्त निरोगी ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.

दररोज २५ हजार वेळा श्वास घेतो आपण
सामान्यपणे आपण दिवसभरात सरासरी २५ हजार वेळा श्वास घेत असतो. परंतु, मोठ्या प्रमाणावर लोक ही प्रक्रिया याेग्य पद्धतीने पूर्ण करत नाहीत. याेग्य प्रकारे श्वास घेतल्यास त्याद्वारे शरीरातील अॅसिड संतुलित राहते. पेशींपर्यंत प्राणवायू पुरेशा प्रमाणात पोहोचतो. श्वासात उतार-चढाव येतो व ऑक्सिजनच्या पुरवठ्यात अडथळा येतो. त्यामुळे चिंता, चिडचिडेपणा, थकवा, एकाग्रतेत अडचणी येतात.

बातम्या आणखी आहेत...