आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Return Of Skilled People Due To The Epidemic In Southern Italy, Which Is Known For Its Poverty And Crime

मिलान:गरिबी-गुन्हेगारीसाठी चर्चित दक्षिण इटलीत महामारीमुळे कुशल लोकांची घरवापसी, हे तरुण या क्षेत्रात नवी आर्थिक दारे उघडताहेत

मिलान / ओटाव्हिया स्पॅगियारी13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इटलीत ‘साऊथ वर्किंग’ ट्रेंडमध्ये 45 हजार युवक उत्तरेतून दक्षिणेत परतले

२८ वर्षीय इटालियन संशोधक इलेना मिलिटेलो युरोपातील सर्वात लहान देश लक्झमबर्गमध्ये काम करत होत्या. त्यांनी १७ वर्षे वयातच दक्षिण इटलीतील आपले शहर पलेर्मो शहर सोडले होते. त्या परत आल्याच नव्हत्या. पण जेव्हा कोरोना युरोपात पोहोचला तेव्हा मिलिटेलो यांनी कार काढली आणि त्या तडक आपल्या घरी पोहोचल्या. काही दिवस वास्तव्यानंतर त्यांनी आईवडिलांसोबत येथेच राहण्याचे ठरवले. मिलिटेलो म्हणाल्या, ‘येथे आल्यानंतर मला जाणीव झाली की मी येथे कायम वास्तव्य केले पाहिजे.’ अशीच भावना असलेल्या मिलिटेलो एकट्या नाहीत. आतापर्यंत ४५ हजार लोक उत्तर इटली आणि युरोपमधून दक्षिण इटलीतील आपल्या शहर आणि गावी परतले आहेत. ६५ हजार लोक येण्याच्या तयारीत आहेत. यात बहुतांश उच्च शिक्षित आहेत. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दुर्गम भागातून काम करण्याची संधी दिल्याने हे शक्य होऊ शकले. हा नवा कल गरिबी, संगठित गुन्हेगारी आणि इटालियन माफियांसाठी चर्चित दक्षिण इटलीसाठी नवी आर्थिक दारे उघडत आहे. उत्तर इटलीच्या तुलनेत येथील बेरोजगारी तीनपट जास्त आहे.

रोममधील सिव्हमेज रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक व अर्थतज्ज्ञ लुका बियानची यांनी सांगितले की, दक्षिण इटली आकर्षक आहे आणि उर्वरित भागाच्या तुलनेत सर्वात स्वस्त आहे. मोठ्या संख्येने कुशल व्यावसायिक आल्याने या क्षेत्रातील गुंतवणुकीचे मार्ग उघडतील. एवढेच नव्हे तर या कलामुळे मोठी शहरे सोडणे आणि दक्षिण क्षेत्राच्या पर्यटनस्थळी जाण्यासाठी लोकांना प्रेरित केले. येथील जनजीवनाची गती संथ आहे. मार्टा आणि गिउलिया मिलान सोडून पलेर्मोत स्थायिक झाले. ते नोकरी करत असतानाच बीचवर वेळही घालवतात.

महामारीने प्राधान्यक्रम ठरवला, अनेकांना कुटुंबीयांसोबतच राहायचेय
मिलिटेलोने साऊथ वर्किंग एनजीओ सुरू केले आहे. उद्देश एकच रिमोट वर्किंगला चालना देणे व दक्षिणेत येणाऱ्या तरुणांची मदत करणे. ही संघटना नवे कार्यालय उघडत आहे. यामुळे बाहेरून आलेले लोक काम करू शकतील. मिलिटेलोंच्या मते महामारीने जीवनाचा प्राधान्यक्रम ठरवून दिला आहे. अनेक जण कुटुंबासोबत आनंद घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...