आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Richest People In The World Love To Work From Home; Bill Gates Likes Washing Dishes, Jeff Bezos Likes Cookies!

दिव्य मराठी विशेष:जगातील सर्वात श्रीमंत लोकांना घरातील काम करणे आवडते; बिल गेट्सना भांडी धुण्याचा छंद, जेफ बेजोसना कुकीजचा नाद !

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुणाला जेवण बनवायला आवडते तर कुणाला कुकीज. कुणाला घरातील रेशन आणणे चांगले वाटते तर कुणी घरातील कचरा टाकून काम करण्याची हौस भागवतो. परंतु कपडे धुवायला कुणालाच आवडत नाही. जगातील अब्जाधीशांना स्वयंपाकघराप्रति अपार प्रेम आहे. रिकाम्या वेळेत घरातील काम करणे हा त्यांचा छंद. फोर्ब्जने जगातील ६५ श्रीमंत लोकांचा सर्व्हे केला. त्यात या गोष्टी समोर आल्या आहेत.

आपल्या मुलांना प्रेरणा मिळावी, त्यांच्यासमोर एक आदर्श उदाहरण असावे, त्यांना कष्टाचे मोल समजावे म्हणून अब्जाधीशांना हे घरकाम प्रिय आहे. मुले गर्विष्ठ होऊ नयेत हाही त्यामागचा हेतू. काहींची कुटुंब आणि मुलांप्रति आत्मीयता दर्शवण्याची ही पद्धत आहे. सर्व्हेत सहभागी अर्ध्या अब्जाधीशांना रिकाम्या वेळेत आपली मुले आणि नातवंडांचा खेळ पाहायला आवडते.

सर्व्हेत सहभागी अर्ध्याहून जास्त लोकांनी सांगितले की, ‘नियमितपणे कचरा टाकणे, किराणा-भाजी आणण्यासारखी कामे आपण करतो.’ ४० टक्के अब्जाधीशांना जेवण बनवायला आणि श्वानासमवेत टेहळणी करण्यात रुची आहे. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांना घरी जेवण बनवायला आणि भांडी धुवायलाही खूप आवडते. सर्व्हेत सहभागी बहुतांश अब्जाधीशांना कपडे धुणे आणि बागेतील गवत कापणे अजिबात आवडत नाही. रिअल इस्टेट गुंतवणूकदार चार्ल्स कोहेन घरातील सामान आणण्यासाठी स्वत: बाहेर पडतात. आपल्या मुलांना आपण काय शिकवण देऊ इच्छितो, हे आपल्यावर अवलंबून असल्याचे ते सांगतात. असे असले तरी काही अब्जाधीशांना घरगुती कामे करणे आवडत नाही. घरातील ज्या कामांसाठी नोकर ठेवता येतात, अशी कामे आपण का करावी हा त्यांचा प्रश्न. अब्जाधीश जेफ ग्रीन रिअल इस्टेट व्यावसायिक आहेत. ते सांगतात, मी कोट्यवधींचा व्यवसाय करतो. घरातील कामात वेळ वाया का घालवू? त्यापेक्षा तीच वेळ व्यवसायासाठी खर्च करेन, पैसा कमवेन, घरातील कामांसाठी दुसऱ्यांना नोकरीवर ठेवता येईल!

मुलांना प्रेरित करणे आणि कुटुंबासमवेत वेळ घालवण्याचा बहाणा
जगातील सर्वाधिक श्रीमंतांपैकी एक असणारे बिल गेट््स केवळ हजार रुपयांचे घड्याळ वापरतात. कुटुंबासमवेत रात्रीच्या जेवणानंतर भांडी घासतात. कुटुंबासाठी जेवण बनवायला त्यांना प्रचंड आवडते. त्यामुळे मुलांना शिकवण मिळते, प्रेरणा मिळते, असे त्यांचे मत. जेफ बेजोस यांच्या मनालाही आपल्या मुलांसमवेत वेळ घालवणे खूप भावते.

बातम्या आणखी आहेत...