आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • The Risk Of Infection Is 18 Times Higher In Closed Environments And 33 Times Higher Risk In Social Events

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना संसर्ग:बंद वातावरणात संसर्गाचे प्रमाण 18 पट जास्त, सामाजिक आयोजनातही 33 पट अधिक धोका

रॉनी करिन रॅबिन10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगभरातील कोरोना संसर्गाच्या एकूण रुग्णांत 38 टक्के भारतातील बाधितांचा समावेश

गेल्या चार दिवसांपासून भारतात रोज तीन लाखांहून जास्त कोरोना रुग्ण आढळतायत. जगभरात एकूण बाधितांत भारताचा वाटा ३८ टक्के झाला आहे. महामारी सुरू झाल्यापासून संसर्गाच्या या उच्च पातळीवर जाणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. जॉन हाफकिन्स विद्यापीठानुसार महिनाभरापूर्वी भारतातील संसर्गाचे हे प्रमाण ९ टक्के होते.

जगभरात कोरोना महामारीवरून हाहाकार आहे. महामारीच्या संसर्गामागील कारणे व प्रतिबंधासाठी संशोधक लसीच्या शोधात रात्रंदिवस कार्यरत आहेत. त्यातच विषाणूच्या पसरण्यामागील नवी माहिती उजेडात आली. माेकळ्या वातावरणाच्या तुलनेत बंद वातावरणात विषाणूची वेगाने बाधा होते, असे स्पष्ट झाले आहे. ब्रिघम व महिला रुग्णालयातील संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. पॉल सॅक्स यांनी ‘द न्यू वर्ल्ड जर्नल’ लिहिलेल्या प्रबंधातून हा दावा करण्यात आला आहे. मोकळ्या वातावरणात हा विषाणू फार काळ टिकाव धरू शकत नाही. अलीकडे झालेल्या अभ्यासानुसार मोकळ्या वातावरणात विषाणू व श्वासासंबंधी इतर विषाणूंचा संसर्ग १० टक्क्यांहून कमी प्रमाणात झाल्याचे दिसून आले. बंद खोलीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. कारण बंद वातावरणात संसर्गाचे प्रमाण १८.७ पट जास्त होते. बंद ठिकाणी होणाऱ्या सामाजिक आयोजनात विषाणू सुपरस्प्रेडर झाला आहे. अशा वातावरणात संसर्ग होण्याची शक्यता ३३ पट जास्त होती. कॅलिफोर्निया विद्यापीठातील महामारी विज्ञान विभागातील असोसिएट प्रोफेसर डॉ. नूशिन रजानी म्हणाले, व्यक्ती किती वेळ बाहेर राहते यावर त्याचा संसर्ग ठरू शकतो. बाहेर राहण्याची वेळ जास्त असल्यास संसर्गाचा धोकाही तितकाच जास्त असू शकतो. म्हणूनच मास्क घालणे, शारीरिक अंतर बाळगणे गरजेचे आहे.

तुर्कीत २९ एप्रिलपासून पुढील १७ तारखेपर्यंत लॉकडाऊन, ४६ लाख बाधित
तुर्कीत कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी २९ एप्रिलपासून लॉकडाऊन लागू केला जाणार आहे. तुर्कीचे राष्ट्रपती रेसिप तय्यव एर्दोगन म्हणाले, कोरोनाशी लढण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन लागू केला जात आहे. गुरुवारपासून सुरू होणारा लॉकडाऊन १७ मेपर्यंत लागू राहील. तुर्कीत महामारी सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४६ लाख लोकांना बाधा झाली आहे. ३८ हजारांहून जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.

जपानमध्ये ५०० पालिकांनी ऑलिम्पिक आयोजन रद्द करण्याची केली मागणी
जपानमध्ये कोरोनाची चौथी लाट आहे. यादरम्यान ऑलिम्पिक खेळांचे आयोजन होऊ घातले आहे. परंतु जपानच्या ५०० महापालिकांनी या काळात ऑलिम्पिकसंबंधी आयोजन करू नये, अशी मागणी केली आहे. कारण कोरोनामुळे पालिकांची आर्थिक स्थिती खराब आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांच्या संपर्कामुळे जोखीम वाढू शकते. जपानमध्ये अनेक ठिकाणी लॉकडाऊन आहे.

ऑस्ट्रेलियाने १५ मेपर्यंत भारतातून येणाऱ्या सर्व थेट प्रवासी विमानांवर बंदी घातली
ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानसेवेवर बंद घातली. १५ मेपर्यंत ही बंदी असेल. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी याबद्दलची घोषणा केली. भारतातून प्रवासी आल्याने निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाने हा निर्णय भारतातील संसर्ग वाढीमुळे घेतला आहे. फिलिपाइन्सनेदेखील भारतातून येण्यास मनाई केली आहे. संसर्ग कमी झाल्यानंतर प्रवास करता येईल.

जगातील १५० हून अधिक धार्मिक नेत्यांचे जलद लसीकरणासाठी अभियान
जगभरातील १५० हून अधिक धार्मिक नेत्यांनी कोरोनाच्या विरोधात अभियान सुरू केले आहे. जगभरातील लसीकरण कार्यक्रमाला गतिमान करणे असा त्यामागील उद्देश आहे. कारण या प्रक्रियेत अनेक प्रकारचे अडथळे येत आहेत. अभियानात दलाई लामांसह रोमन कॅथोलिक चर्चचे कार्डिनल पीटर टर्कसन यांचाही समावेश आहे. लसीकरणाबाबतचा राष्ट्रवाद संपावा. पुढील महिन्यात जी-७ बैठकीत लसीच्या पुरवठ्याबाबत ठोस योजना करावी.

जगभरातील कोरोना संसर्गाच्या एकूण रुग्णांत 38 टक्के भारतातील बाधितांचा समावेश
- पाकिस्तानात कोरोनामुळे परिस्थिती वाईट बनली. स्थानिक प्रशासनाच्या मदतीसाठी १६ शहरांत सैन्य तैनात करण्यात आले.
- थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान-आेचा यांना मास्क घातला नसल्याबद्दल १९० डॉलर म्हणजे सुमारे १४ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावला.
- कोरोना लस घेतलेले लोक इस्रायलला जाऊ शकतील. मेपासून अशा लोकांच्या प्रवेशाची तयारी सुरू आहे.
- कॅनडाच्या आेंटारियो प्रांतात कोरोनाचा संसर्ग जास्त आहे. मदतीसाठी सैन्य, रेडक्रॉस मैदानात.
- भारतातून स्पेनला जाणाऱ्या लोकांना क्वाॅरंटाइन व्हावे लागणार. सरकारचे आदेश जारी.

बातम्या आणखी आहेत...