आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Science Of Gifts; Give A Gift That Commemorates The Achievement; It Will Be A First Experience...people Will Treasure It For Life

भेटवस्तूंचे शास्त्र:अशी भेट द्या, जी कर्तृत्वाची आठवण करून देईल; पहिला अनुभव ठरेल...लोक आयुष्यभर तिची जपणूक करतील

वॉशिंग्टन8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढदिवस, लग्न किंवा कोणत्याही सणाला कुणाला कोणती भेट द्यायचीे, अनेकदा ही गोष्ट त्रास देते. काय द्यायचे हे समजत नसेल तर ते सोपे काम नाही हे समजून घ्या. भेटवस्तू देणे हे एक शास्त्र आहे. वेस्ट व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीतील वितरणाच्या प्राध्यापिका ज्युलियन गिवी म्हणतात की, भेटवस्तूंचा संबंधांवर दीर्घ परिणाम होतो. त्या दुरावा मिटवितात. भेटवस्तूंची बाजारपेठ हजारो कोटींची आहे. भेटवस्तू देण्यासाठी तिने ६ वैज्ञानिक टिप्स दिल्या आहेत.

{हृदयस्पर्शी भेटवस्तू द्या : लोकांना अशा भेटवस्तू द्या ज्या हृदयस्पर्शी असतील. त्या कायमसाठी जतन केल्या जातील. वापरल्यानंतर फेकून देण्यायाेग्य वस्तू देऊ नका. जर्नल ऑफ कंझ्युमर रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, लोकांना भेटवस्तू हव्या आहेत ज्या त्यांना नातेसंबंधाची आठवण करून देतात, जसे की एकत्र चित्र, अल्बम, जे नातेसंबंध जाेडून ठेवतात.

{एखाद्या यशस्वी कामगिरीचे स्मरण करणाऱ्या भेटवस्तू : भेटवस्तू देण्याच्या शास्त्रावर संशोधन करणारे वॉशिंग्टन विद्यापीठातील विपणन विषयाचे प्राध्यापक रॉबिन लेब्युफ म्हणतात की, एखादी भेटवस्तू जी एखाद्या कामगिरीचे स्मरण करून देते. एखादी व्यक्ती आयुष्यभर अशी भेट जपून ठेवते. ते म्हणतात की रेस्टॉरंट कुपन ही चांगली भेट नाहीच.

{अशी वस्तू जाे अनुभव ठरेल : अँडरसन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील प्रोफेसर केसी म्झिलनर होम्स म्हणतात की अशा भेटवस्तू ज्या एखाद्या व्यक्तीला नवीन अनुभव देतात. त्या आयुष्यभर लक्षात राहतात. एखाद्या गिर्यारोहण शिबिरात जाण्यासाठी टूरचे तिकीट ही पण भेटवस्तूच. अट एवढीच आहे की ज्याला ती दिली जात आहे, त्याच्यासाठी हा अनुभव पहिला असावा.

{गोष्टी सुलभ करा: कधीकधी आपल्याला अनेक लोकांसाठी भेटवस्तू खरेदी कराव्या लागतात. लेबॉफने दोन मार्ग सुचवले, प्रथम, साधे असले तरी प्रत्येकाला ते आवडेल असे काहीतरी द्या, किंवा प्रत्येकाच्या पसंतीचे वेळवेगळे काहीतरी निवडा. परंतु प्रत्येकाला वेगवेगळ्या भेटवस्तू द्याव्या लागतात म्हणून कधीही घेऊ नका.

{तुमची निवड कोणावरही लादू नका: लेबॉफ म्हणतात, भेटवस्तू देताना हे लक्षात ठेवा की तुम्ही तुमची निवड कोणावरही लादत नाही आहात.

तुम्ही एखाद्या खास व्यक्तीस भेटवस्तू देताना स्वार्थी भावना नसावी तुम्ही एखाद्या खास व्यक्तीला भेटवस्तू देता तेव्हा स्वार्थी होऊ नका. एखादी गोष्ट जी तुमच्याकडे आहे आणि त्यालाही आवडते, त्याला तुम्हाला भेटवस्तू द्यायची असेल तर ती कदाचित त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम भेटवस्तूंपैकी एक असू शकते. ती जुने घड्याळ किंवा शर्ट देखील असू शकते.

बातम्या आणखी आहेत...