आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकत्व:अमेरिकेत बेबी फूडच्या टंचाईमुळे आईच्या दुधाचे शेअरिंग वाढले

कॅथरीन पिअर्सनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत बेबी फूडच्या टंचाईमुळे नवीन पालकांना त्यांच्या बाळांचे पोट भरणे कठीण होत आहे. काही लोकांनी आईच्या दुधाच्या शंअरिंगचा मार्ग शोधला आहे. दुधाची मागणी करणाऱ्या आणि देणाऱ्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर वाढल्या आहेत. ह्युमन मिल्क फॉर ह्युमन बेबीज हा फेसबुकवरील ब्रेस्ट मिल्क शेअरिंग प्लॅटफॉर्म सांगतो की, बेबी फॉर्म्युल्याच्या कमतरतेपूर्वीच मोठ्या संख्येने दूध दाते आणि घेणारे प्लॅटफॉर्मवर सामील झाले होते. येथे गेल्या काही दिवसांपासून याआधी कधीही दूध दान न करणाऱ्या मातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गरजू लोकांचा त्रास कमी होत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाने बाधित महिलांच्या दुधात विषाणूपासून बचाव करण्याच्या क्षमतेचे संशोधन समोर आल्यानंतरही आईच्या दुधाचे वाटप वाढले आहे.

आईच्या दुधाच्या वाढत्या शेअरिंगदरम्यान तज्ज्ञांनी म्हटले आहे की, या प्रणालीशी संबंधित काही धोके आहेत. अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स आणि अन्न, औषध प्रशासनाने शेअरिंग करताना सावधगिरी बाळगण्याची शिफारस केली आहे. ते म्हणतात, दात्याच्या दुधात काही गडबड असू शकते. मूल अनवधानाने काही हानिकारक औषध खाऊ शकते. त्यामुळे मान्यताप्राप्त मिल्क बँकेतून दूध घेणे योग्य ठरेल. अकादमी शिफारस करते की, नवजात बालकांना ते सहा महिन्यांचे होईपर्यंत केवळ आईचे दूध आणि ते एक वर्षाचे होईपर्यंत आईच्या दुधासह पूरक आहार द्यावा. परंतु, अमेरिकेतील केवळ २५ टक्के मुले सहा महिने आईच्या दुधावर जगतात. एक वर्षासाठी आईचे दूध मिळणारे ३५ टक्के आहेत. दूध बँकांच्या माध्यमातून औपचारिक दूध वाटप केले जाते. यामध्ये एचआयव्ही, हिपॅटायटिस-बी संसर्गापासून ते औषधांच्या वापरापर्यंत दात्यांची तपासणी समाविष्ट आहे.

बातम्या आणखी आहेत...