आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Situation Of Women And Girls In Afghanistan Is Very Bad, Biden Should Take Drastic Steps; Imran Should Allow Refugees To Come To Pakistan

तालिबानवर मलाला:अफगाणिस्तानात महिलांची स्थिती खूप वाईट; अमेरिकेने कठोर पावले उचलावीत; खान यांनी शरणार्थींना आश्रय द्यावा, मलाला युसूफझाईचे आवाहन

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बायडेन यांनी त्वरित कठोर उपाययोजना करावी

नोबेल शांतता पुरस्कार मिळवणाऱ्या पाकिस्तानी सामाजिक कार्यकर्त्या मलाला युसूफझाई यांनी अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या मलाला यांनी मंगळवारी सांगितले की, अफगाणिस्तानातील महिला आणि मुली सुरक्षित नाहीत. जागतिक नेत्यांनी यावर त्वरित कारवाई करावी. मलालाने पाकिस्तान सरकारला अफगाण शरणार्थींना जागा देण्याचे आवाहनही केले आहे.

बीबीसीशी बोलताना मलाला म्हणाल्या की सध्या मानवतेवर हे सर्वात मोठे संकट आहे. आपण अफगाणिस्तानच्या लोकांना मदत केली पाहिजे. मलाला म्हणाल्या की, 'मी अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी माझे बोलणे झाले आहे. भविष्यात त्यांचे काय होईल हे त्यांना समजत नाहीये'.

बायडेन यांनी त्वरित कठोर उपाययोजना करावी
मलाला म्हणाल्या की, आपला मुद्दा जगातील नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. मलाला म्हणाल्या की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानच्या लोकांच्या संरक्षणासाठी त्वरित आणि मोठी पावले उचलायला हवीत. सोमवारी रात्री आपल्या पत्रकार परिषदेत बायडेन यांनी अफगाणिस्तानच्या संकटांसाठी अफगाण नेत्यांना दोषी ठरवले. ते म्हणाले होते की अफगाण सैन्याने लढाई न करता तालिबानला आत्मसमर्पण केले.

इम्रान खान यांना पत्र लिहिले
मलाला म्हणाल्या की त्यांनी अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये अफगाणिस्तानमधून येणाऱ्या लोकांना आश्रय देण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून तालिबानच्या भीतीने अफगाणिस्तान सोडणाऱ्या लोकांना राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळेल.

कोण आहे मलाला युसूफझाई?
मलालाचा जन्म 1997 मध्ये पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील स्वात खोऱ्यात झाला. मलालाच्या वडिलांचे नाव झियाउद्दीन युसूफझाई आहे. 2007 ते 2009 पर्यंत तालिबानने स्वात खोऱ्यात प्रचंड दहशत निर्माण केली होती. मलालाही या दहशतीचा बळी ठरली होती.

10 वर्षे मोठ्या मुलांसोबत बसून अभ्यास करत होती
तालिबानी दहशतवाद्यांच्या भीतीने मुलींनी शाळेत जाणे बंद केले होते. मलाला तेव्हा आठवीच्या वर्गात शिकत होती. मलालाची एक शिक्षिका सांगते की जेव्हा ती अडीच वर्षांची होती, तेव्हा ती तिच्या वडिलांच्या शाळेत स्वतःपेक्षा 10 वर्षांनी मोठ्या मुलांसोबत बसून अभ्यास करायची. ती लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होती.

गुल मकाईच्या नावाने तालिबानच्या विरोधात लिहिलेले
2009 मध्ये मलालाने बीबीसीसाठी गुल मकाई नावाने एक डायरी लिहायला सुरुवात केली आणि तिचे खरे नाव लपवले. यामध्ये तिने स्वातमध्ये तालिबानच्या वाईट कृत्यांचा उल्लेख केला. बीबीसीसाठी डायरी लिहित असताना मलाला पहिल्यांदा जगाच्या लक्षात आली जेव्हा तिची ओळख डिसेंबर 2009 मध्ये मलालाचे वडील झियाउद्दीन यांनी सार्वजनिक केली. मलालावर आधारित एक चित्रपट गुल मकई या नावाने जानेवारी 2020 मध्ये प्रदर्शित झाला.

मलालाला तालिबानने डोक्यात गोळी घातली होती
ज्या बसमध्ये मलाला तिच्या साथीदारांसोबत शाळेत जात होत्या त्यात 2012 मध्ये तालिबानी अतिरेकी चढले. दहशतवाद्यांनी मलालावर गोळी झाडली जी तिच्या डोक्यात लागली. मलाला बरी व्हावी यासाठी संपूर्ण जगाने प्रार्थना केली. लवकरच ती बरी झाली. या घटनेनंतर मलालाने एका मीडिया संस्थेसाठी ब्लॉग लिहायला सुरुवात केली. त्यानंतर ती लोकांच्या नजरेत आली.

बरी झाल्यानंतर झाला बक्षिसांचा वर्षाव
जेव्हा ती बरी झाली, तेव्हा आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार, पाकिस्तानचे राष्ट्रीय युवा शांतता पुरस्कार (2011) यासह अनेक मोठ्या सन्मान मलाला मिळू लागले. 2012 मध्ये मलालाचे नाव सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. तिच्या शौर्यासाठी, संयुक्त राष्ट्र संघाने मलालाचा 16 वा वाढदिवस 12 जुलै रोजी मलाला दिन म्हणून घोषित केला. मलालाला 2013 मध्ये नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते. त्याच वर्षी तिला युरोपियन युनियनचे प्रतिष्ठित शाखरोव मानवाधिकार पारितोषिकही मिळाले.

बातम्या आणखी आहेत...