आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील सर्वात स्वच्छ सरोवरांत समाविष्ट कॅलिफोर्नियाच्या ताहो सरोवराचे वैभव पुन्हा परतले आहे. त्यासाठी वर्षभर लोकसहभागातून स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले. त्याची सुरुवात २०१८ मध्ये झाली. सरोवराच्या परिसरातील नागरिकांनी एक संघटना तयार केली. तेव्हा सरोवराचे पाणी अशुद्ध होत चालले होते. लोकांनी सरोवर स्वच्छ करण्याचा संकल्प केला. म्हणूनच ‘क्लीन अप द लेक’ नावाच्या एनजीओची स्थापना करून क्राऊड फंडिंगद्वारे ७४ लाख रुपये उभारले. संघटनेने स्कूबा डायव्हर्सना स्वच्छतेचे काम सो पवले. एक वर्ष चाललेल्या स्वच्छता अभियानानंतर सरोवराचे पाणी आता निर्मळ झाले आहे.
अकराशे किलो कचऱ्यात कॅमेरे-पथदिवेही
सरोवराच्या २५ फूट खालून अकराशे किलो कचरा काढण्यात आला. त्या कचऱ्यात जुने कॅमेरे, पथदिवेही होते. कचऱ्यात आढळून आलेल्या सामानाची विक्री केली जाईल. तो पैसा सरोवर विकासासाठी लावला जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.