आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Sparkling New York City In Darkness Due To Corona; Corona Death Toll Reaches 8,000 In The United States

न्यूयॉर्क:झगमगणारी न्यूयाॅर्क नगरी काेराेनामुळे बकाल, स्मशानभूमीत नाही राहिली जागा; अमेरिकेत कोरोनामुळे मृतांची संख्या पोहोचली ११ हजारांवर

न्यूयॉर्क3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क सिटीच्या चिकित्सा परीक्षण कार्यालयाबाहेर तात्पुरते बनवलेले कबरस्तान : छायाचित्र न्यूयॉर्क शहरातील मुख्य चिकित्सा परीक्षा कार्यालयाबाहेर एक अस्थायी स्वरूपाचे कबरस्तान तयार करण्यात आले आहे. या समस्येवर शहराचे महापौर बिल डी. ब्लासियो म्हणाले, संसर्ग वाढल्यानंतर स्मशानभूमीची क्षमता कमी पडते. सार्वजनिक ठिकाणी पार्थिवांना तात्पुरत्या स्वरूपात दफन करण्याच्या योजनेवर अधिकारी काम करत आहे. - Divya Marathi
न्यूयॉर्क सिटीच्या चिकित्सा परीक्षण कार्यालयाबाहेर तात्पुरते बनवलेले कबरस्तान : छायाचित्र न्यूयॉर्क शहरातील मुख्य चिकित्सा परीक्षा कार्यालयाबाहेर एक अस्थायी स्वरूपाचे कबरस्तान तयार करण्यात आले आहे. या समस्येवर शहराचे महापौर बिल डी. ब्लासियो म्हणाले, संसर्ग वाढल्यानंतर स्मशानभूमीची क्षमता कमी पडते. सार्वजनिक ठिकाणी पार्थिवांना तात्पुरत्या स्वरूपात दफन करण्याच्या योजनेवर अधिकारी काम करत आहे.
  • रिपब्लिकन राज्यांत लॉकडाऊन नाही, ईस्टरची तयारी सुरू

‘न्यूयाॅर्कला द सिटी दॅट नेव्हर स्लीप्स..’ असे आेळखले जाते. सतत वर्दळ, राेषणाई, वाहने, बाजारपेठ व गर्दीने गजबजणारे हे शहर कधीही झाेपत नाही, असा याचा लाैकिक. परंतु, सध्या ते बकाल वाटते. रस्ते सुनसान आहेत. आमच्या मित्राचे रूममेट्स मूळ गावी निघून गेले. एकटे असलेले लाेक आता डिप्रेशनमध्ये आहेत. आम्हाला नाेकरीवरून काढण्यात आले आहे. आम्ही टीव्ही पाहणे देखील बंद केले आहे. साेशल मीडियाही चेक करत नाहीत. सतत भीती अनुभवतोय. ही परिस्थिती नैराश्य आणणारी आहे.’न्यूयाॅर्कच्या एका शाळेत फाेटाेग्राफी-व्हिडिआे हा विषय शिकवणारे फाेटाेग्राफर स्पंदिता मलिक हे सांगू लागतात. तेव्हा त्यांचा आवाज खाेल गेल्यासारखा जाणवत राहताे. संघर्षशील महिलांच्या फाेटाेग्राफीसाठी स्पंदिता यांना आेळखले जाते. अस्तंगत हाेत असलेल्या कलेच्या माध्यमातून राेटीराेजी कमावतात. त्या तीन रुममेट्ससह न्यूयाॅर्कमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतात. इतर रूममेट्स फाेटाेग्राफर आणि फॅशन क्षेत्रातील आहेत.   अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत ११ हजार मृत्यू झाले आहेत. सर्वात वाईट स्थिती न्यूयॉर्कची आहे. येथे आतापर्यंत ४ हजार ७५८ जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क शहरात स्मशानभूमीसाठी जागाही शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपातील कबरस्तान तयार केले जात आहेत.      दुसरीकडे अमेरिकेत भारतीय समुदायाच्या म्हणण्यानुसार न्यूयाॅर्क व न्यूजर्सीमध्ये राहणाऱ्या बहुुसंख्य भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे.आम्ही सर्वांनी नाेकऱ्या गमावल्या आहेत. न्यूयाॅर्कमध्ये दरराेज लाेकांचा मृत्यू हाेत आहे. मृतदेह ठेवायला देखील जागा राहिलेली नाही. माझी एक रूममेट वुहानची (चीन) आहे. तिला कुटुंबाची खूप चिंता वाटू लागते. तिच्याकडे पाहून आम्ही डिप्रेशनमध्ये येताे. त्यावर एका रूममेट म्हणाली, आम्ही आता बातम्या पाहत नाहीत. नाेटिफिकेशन देखील बंद करणार आहाेत. आम्ही आता बेक करणार, कुकिंग करणार, खेळणार, फाेटाेग्राफी करणार आहाेत. स्पंदिता म्हणाल्या, काेराेना काेठून आला ? व काेणी पसरवला? यावर न्यूयाॅर्कमध्ये मुळीच चर्चा हाेत नाही. या विषाणूच्या संसर्गापासून कसा बचाव करायचा यासाठीच प्रयत्न करताना लाेक दिसतात. हे सर्व कधी थांबेल? या विचाराने स्पंदिता यांच्या मनात काहूर उठतेय. न्यूयाॅर्कला आता प्रत्येकाचीच भीती वाटू लागली. त्या हळूच म्हणाल्या ‘एव्हरीथिंग इज व्हेरी स्केअरी नाऊ..’आयटी प्राेफेशनल अर्पित वर्मा म्हणाले, आयटीतील लाेक वर्क फ्राॅम करत आहेत. न्यूयाॅर्कमध्ये प्रत्येकजण प्रत्येकाला पाहून पळून जात आहे. एखाद्या माणसाजवळून गेले तरी काेराेना हाेईल की काय, एवढी दहशत लाेकांमध्ये दिसून येत आहे. न्यूयाॅर्कमध्ये संसर्गाचे सांगितले जाणारे आकडे सत्य स नाहीत, असे वाटते. कारण संसर्गाचा आकडा माेठा असू शकताे. कारण प्रत्येकाची चाचणी घेतली जात नाही. ५० वर्षांहून जास्त वयाच्या लाेकांची तपासणी केली जात आहे. त्यातही कर्कराेग, लिव्हर, किडनी किंवा इतर गंभीर आजाराने पीडित लाेकांची तपासणी केली जात आहे. शिंकणे, ताप, घशात वेदना, ट्रॅव्हल हिस्ट्री किंवा धाेका असलेल्या व्यक्तींची २० मिनिटे भेट घेतलेल्यांची काेराेना तपासणी केली जात आहे. 

सरकार भाडे देतेय 

अर्पित व स्पंदिता म्हणाले, येथील सरकार लाेकांची काळजी घेते. काेणताही घरमालक भाडेकरूला घराबाहेर काढू शकत नाही. ताे भाडेकरूकडून तीन महिन्यांपर्यंत भाडे वसूल करू शकणार नाही. त्यास भाडे हवे असल्यास सरकार भाडेकरूस मदत करेल. त्याशिवाय वार्षिक १ लाख डाॅलर कमावणाऱ्यांना सरकार १२०० डाॅलर, विवाहितांना २४०० डाॅलर व एक मूल असल्यास ५०० डाॅलर अतिरिक्त खात्यावर जमा करते. बेघर मजुरांच्या खात्यावर ३ हजार डाॅलर दिले जातात.

रिपब्लिकन राज्यांत लॉकडाऊन नाही, ईस्टरची तयारी सुरू

न्यूयाॅर्कमधील पत्रकार माेहंमद अली म्हणाले, या समस्येला अमेरिकेच्या सरकारने गांभीर्याने घेतले नाही. रिपब्लिकन स्टेटसमध्ये लाॅकडाऊन केलेले नाही. या आजारामुळे वृद्ध लाेक मृत्युमुखी पडतील. एवढेच नव्हे तर येथे ईस्टरची तयारी केली जात आहे. ईस्टरपर्यंत सर्वकाही ठीक हाेईल, असे राष्ट्राध्यक्ष सांगू लागले आहेत. अली म्हणाले, माझ्या एका मित्राच्या छातीत कळ निघाली. त्याने रुग्णालयात फाेन केला. तेव्हा तुम्ही घरीच राहा. तेथे राहून उपचार करा. रुग्णालयात इन्फेक्शन खूप आहे, असे सांगण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...