आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जर्मनीत गोवंशासाठी रिटायरमेंट होममध्ये काम करण्याची गरज नाही, केवळ खाणे-पिणे आणि देखभालीवर भर!

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मांस-डेअरी उत्पादनांपासून दूर होणाऱ्या युरोपीय देशाची कहाणी क्रांतिकारी

जर्मनीच्या बटजाडिंगन शहरात गाईंसाठी रिटायरमेंट होम तयार करण्यात आले आहे. गाईंनी दूध देण्याची गरज नाही. त्यांनी केवळ खाणे-पिणे आणि विश्रांती घ्यावी. एवढेच येथे अपेक्षित आहे. गाईंना नैसर्गिक वातावरण मिळावे यासाठी रिटायरमेंट होममध्ये गोवंश, घोडे, श्वान, कोंबड्या, बदकही ठेवण्यात आले आहेत. अशा प्रकारे हे पाळीव प्राण्यांचे अभयारण्य बनले आहे. येथे सर्व प्रकारचे प्राणी मुक्त वातावरणात भटकंती करतात. ते एकमेकांसोबत आनंदाने वावरतात. या प्राण्यांकडून कोणतेही काम करून घेतले जात नाही. हे रिटायरमेंट होम कॅरिन मक व त्यांचे सहकारी जन गेरडेस चालवतात. ते म्हणाले, जास्तीत जास्त प्राण्यांना मारू इच्छित होते. निरुपयोगी पशूंना मारण्याची लोकांची योजना होती. आम्ही त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून आणले आहे. आता ते निवृत्तीचे जीवन जगत आहेत.

पशूंकडून काम करून घेण्याची गरज नाही, असे आम्ही मानतो. त्यांना खाण्यासाठी वापरले जाऊ नये. पाळीव प्राण्यांचे हे अभयारण्य सुमारे १०० एकर क्षेत्रात पसरलेले आहे. अगोदर येथे डेअरी फार्म होता. त्यामुळे गाईंसाठी सुलभ वातावरण मिळाले. कॅरिन म्हणाल्या, जनावरे शांततेने कसे नांदू शकतील, याचा आपण विचार करायला हवा. जनावरांच्या देखभालीसाठी कॅरिन, गेरडेस यांच्या मदतीला क्रिस्टिना बर्निंग, सेलीन व मिशेल आहेत. आपल्या गाईला कत्तलखान्यात नेले जाऊ नये, असे क्रिस्टिनाला वाटे. त्यामुळे तिने वडिलांशी संघर्ष केला आणि गाईला तिने रिटायरमेंट होममध्ये दाखल केले. आता ती रिटायरमेंट होमला भेट देऊन तेथील पशूंची देखभाल करते. या अभयारण्यात पशूंची वेगवेगळी नावे ठेवण्यात आली आहेत.

२० लाख शाकाहारी लोक वाढले, दुग्ध उत्पादनात वाढ
कॅसल विद्यापीठातील संशोधकांच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी जर्मनीत प्रतिव्यक्ती केवळ ५७ किलो मांस खाल्ले जात होते. हा आकडा १९८९ नंतर सर्वात कमी आहे. ३२ वर्षांत जर्मनीत शाकाहारींची संख्या वाढून २० लाख झाली आहे. जर्मनीत शाकाहारी उत्पादनांना प्रोत्साहन दिले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...