आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'आम्हाला याचा मेंदू हवा आहे, कारण तो जगातील सर्वात हुशार मेंदू आहे'...असे शास्त्रज्ञ एका गुन्हेगाराविषयी म्हणाले होते. हा गुन्हेगार जगातील सर्वात धूर्त व्यक्ती होता. त्यामुळे त्याचा मेंदू कसा कार्य करतो हे वैज्ञानिकांना तपासून पहायचे होते. हा व्यक्ती अत्यंत सर्वसाधारण होता. पण 'शैताना'हून कमी नव्हता. ही कहाणी आहे जगातील एका सर्वात खतरनाक सीरियल किलरची, ज्याचा मेंदू वैज्ञानिकानी संशोधनासाठी आपल्या ताब्यात घेतला. सध्या ते त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग करत आहे. या किलरचे डोके मागील 176 वर्षांपासून काचेच्या एका भांड्यात जतन करण्यात आले आहे.
सीरियल किलर दिएगो अल्व्हेसची कहाणी
सीरियल किलर दिएगो अल्व्हेस स्पेनचा होता. पण त्याने पोर्तुगालमध्ये असा कहर केला की, आज अनेक वर्षांनंतरही त्याचे नाव ऐकून पोर्तुगालच्या नागरिकांचे प्राण कंठाशी येतात. दिएगो अल्वेसचा जन्म 1818 मध्ये स्पेनच्या गॅलेसियात झाला. तो अत्यंत गरीब कुटुंबातील होता. आर्थिक तंगीमुळे त्याने बालपणीच नोकरीचा शोध घेतला. पण त्याला काम मिळाले नाही. नोकरीच्या शोधात तो पोर्तुगालच्या लिस्बनला पोहोचला. प्रदिर्घ काळापर्यंत त्याने येथे नोकरी शोधली. पण त्याला नकाराशिवाय काहीच मिळाले नाही.
गरिबीमुळे गुन्हेगारीकडे वळला
आर्थिक तंगी व बेरोजगारीमुळे अल्व्हेसने गुन्हेगारीचा असा मार्ग निवडला की, पुढे चालून तो अक्षरशः शैतान बनला. अल्व्हेसला पैशांची गरज होती. त्याने त्यासाठी लूटमार सुरू केली. तो लोकांना पकडून त्यांच्या खिशातील पैसे काढत होता. हळू-हळू त्याला हे काम आवडू लागले. आता त्याने या कामासाठी अधिक धोकादायक मार्ग निवडला.
सीरियल किलरच्या निशाण्यावर शेतकरी
अल्व्हेस साध्याभोळ्या शेतकऱ्यांना लक्ष्य करत होता. त्याने त्यांची कत्तलही सुरू केली होती. शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी बाजारात जात होते. ते रात्री घरी परतत. त्यावेळी त्यांच्याकडे मालाचे पैसेही असत. ते अल्व्हेसने लुटणे सुरू केले. एवढेच नाही तर हे पैसे लुटल्यानंतर तो शेतकऱ्यांची हत्याही करत होता.
पैसे घेऊन पुलावरून ढकलून देत होता
अल्व्हेसने एका पुलाला आपल्या गुन्ह्याचा अड्डा बनवले होते. हा पूल गाव शहराला जोडणारा होता. शेतकरी रात्री त्या पुलावरून जात असत. तेव्हा सीरियल किलर या पुलावर लपून बसत. शेतकरी या पुलावर आले की त्यांना तो अत्यंत निर्दयीपणे ठार करत होता. हे त्याचे रोजचे काम होते. नदीतून लागोपाठ अनेक शेतकऱ्यांचे मृतदेह आढळून येत होते. पण हे खून कोण करत होतो, याचा थांगपत्ता कुणालाच लागत नव्हता.
पोलिसांना हवा होता सीरियल किलर
अल्व्हेसने रात्रीच्या अंधारात अनेकांना ठार केले. पोलिसांना आढळलेले सर्वच मृतदेह अत्यंत निर्दयीपणे मारहाण करून पुलावरून फेकल्याच्या स्थितीत होते. त्यावरून हे काम एखाद्या सीरियल किलरचेच असल्याचे स्पष्ट होते. त्यानुसार, पोलिस आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवत होते. त्यामुळे आता हत्या केली तर आपण पोलिसांच्या हाती सापडू हे अल्व्हेसला ठावूक होते. त्यानंतर त्याने काही काळासाठी खूनसत्र थांबवले. त्याने पोलिस तपास मंदावण्याची वाट पाहिली.
अल्व्हेसने बनवली होती स्वतःची गँग
या काळात अल्व्हेसने स्वतःची गँग तयार करण्यास सुरुवात केली. त्याने लिस्बनच्या गरीब लोकांना आपल्यासोबत जोडले. काही काळ थांबल्यानंतर त्याने सूनियोजितपणे लोकांची हत्या करणे सुरू केले. तो आपल्या सहकाऱ्यांसोबत जंगलात दबा धरून राहत होता. जंगलातच त्याने आपला मुक्काम ठोकला. रात्र होताच तो आपल्या शिकारीवर हल्ला करत होता. तो लोकांचे पैसे लुटून त्यांना हाल-हाल करून ठार मारत होता. असे सांगितले जाते की, नागरिक त्याच्या भीतीने आपल्या घरातही लपून राहत होते. लिस्बनमध्ये या सीरियल किलरची एवढी भीती पसरली होती की, नागरिक अत्यावश्यक कामासाठीही घराबाहेर पडण्यास घाबरत होते.
77 शेतकऱ्यांचा केला खून
दिएगो अल्व्हेसची अनेक वर्षांपर्यंत दहशत होती. अखेरीस 1941 मध्ये पोलिसांनी या गुंडाच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर अल्व्हेसने स्वतःच आपण आतापर्यंत 77 जणांची निघृण हत्या केल्याची कबुली दिली. तो म्हणाला - मला लोकांना हालहाल करून ठार मारण्यात मजा वाटत होती. मी हे काम अनेक वर्षांपर्यंत केले. पण पोलिस माझे काहीच वाकडे करू शकले नाही. कोर्टाने अल्व्हेसला 77 जणांच्या हत्येप्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली.
काचेच्या भांड्यात आहे सीरियल किलरचे डोके
फाशीनंतर संशोधकांच्या मागणीनुसार अल्व्हेसचे शिर सांभाळून ठेवण्यात आले. या गोष्टीला आता 176 वर्ष लोटलेत. पण आजही अवघ्या पोर्तुगालला हलवून सोडणाऱ्या या सीरियल किलरचे डोके जशास तसे आहे. ते लिस्बन विद्यापीठात लिक्विड सॉल्युशनमध्ये सांभाळून ठेवण्यात आले आहे. त्यावेळी पोर्तुगालमध्ये फ्रेनोलॉजी अर्थात ब्रेन स्टडीच्या अभ्यास करण्याची फार क्रेझ होती. त्यामुळे अल्व्हेसच्या मेंदूचा अभ्यास केला तर त्यातून अनेक नव्या गोष्टी उजेडात येऊन त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल, असे संशोधकांचे म्हणणे होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.