आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मूक आंदोलनाने मागणी...:इंग्लंडमध्ये पीपीई किटसाठी संघर्ष, भारतीय महिला डॉक्टरने केले नेतृत्व

वॉशिंग्टन10 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • मीनल ८ महिन्यांच्या गर्भवती आहेत, तरीही त्या आपल्या सहकाऱ्यांसाठी लढत आहेत

इंग्लंडची राजधानी लंडनच्या डाउनिंग स्ट्रीट येथे डॉक्टरांनी कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किटची मागणी करत मूक आंदोलन केले. या मोहिमेचे नेतृत्व भारतीय वंशाच्या डॉ. मीनल विज यांनी केले. इंग्लंडमध्ये पीपीई किटसाठी सरकारविरोधात डॉक्टरांनी कायदेशीर संघर्ष सुरू केला आहे. यासाठी डॉ. मीनल विज यांनी लोकनिधीच्या माध्यमातून ५० लाख रुपये गोळा केले आहेत. मीनल ८ महिन्यांच्या गर्भवती आहेत. तरीही त्या आपल्या सहकाऱ्यांसाठी लढत आहेत. त्यांनी सांगितले, आम्ही त्या २३७ सहकाऱ्यांसाठी मौन पाळले ज्यांनी कोरोनाचा सामना करत आपला जीव गमावला. ज्या वेळी डॉक्टर डाउनिंग स्ट्रीटवर मूक आंदोलन करत होते त्याच वेळी कोरोना योद्ध्यांच्या सन्मानासाठी लंडनमध्ये ‘क्लॅप फॉर केअरर्स’ कार्यक्रम सुरू होता.

अमेरिकेत नर्सचे आंदोलन

पोर्ट शेर्लोट | अमेरिकेतील फ्लोरिडा राज्याच्या पोर्ट शेर्लोट शहरातही नर्सनी पीपीई किटच्या मागणीसाठी आंदोलन केले. यात त्यांचे कुटुंबीयही सहभागी झाले. नर्सनी सांगितले की, पीपीई किटच्या कमतरतेमुळे त्या तणावात आहेत. मागणी केल्यानंतर नोकरीवरून काढण्याची धमकी दिली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...