आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूल स्फोट:मृत्यूपेक्षा तालिबानचेच भय अधिक, विमानतळावर पूर्वीपेक्षाही जास्त गर्दी; काबूलमध्ये अद्यापही काही लोक अडकलेले, स्थिती बदलत आहे : भारत

काबूल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल विमानतळावर शुक्रवारी असे चित्र होते. अमेरिकाने पुन्हा स्फोटांचा अलर्ट जारी केला आहे. मात्र, आयुष्य पणाला लावून लोक तेथे येत आहेत. - Divya Marathi
काबूल विमानतळावर शुक्रवारी असे चित्र होते. अमेरिकाने पुन्हा स्फोटांचा अलर्ट जारी केला आहे. मात्र, आयुष्य पणाला लावून लोक तेथे येत आहेत.

काबूल स्फोटांना अनेक तास उलटूनही विमानतळाबाहेर निराशा पसरली आहे. शुक्रवारी काबूलमध्ये बाजारपेठा-दुकाने बंद होती. शहरात गस्त घालणारे सशस्त्र तालिबानी लोकांना घरांतच राहण्यास सांगत होते. मात्र, लोकांना लवकर अफगाणिस्तानाबाहेर जायचे आहे. त्यांना स्फोटांच्या इशाऱ्यांचीही पर्वा नाही. विमानतळ ही काबूलहून बाहेर पडण्याची एकमेव आशा आहे. मात्र स्फोटानंतर ते तालिबानने बंद केले होते. त्यांनी विमानतळ घेरले आहे. शुक्रवारी दुपारी पुन्हा विमान उड्डाणे सुरू झाली. लोक जिवाची पर्वा न करता पुन्हा विमानतळावर गर्दी करू लागले आहेत. मात्र बऱ्याच लोकांची येथून बाहेर पडण्याची आशा मावळत आहे. महिन्याअखेर अमेरिकी लष्कर निघून जाईल जेव्हा हजारो लोक मागेच राहतील, असे त्यांना वाटत आहे. ३३ वर्षीय अफगाणी नागरिक व ब्रिटिश पासपोर्टधारक तजुमल खान म्हणाले, ‘मी पत्नी व २ मुलांसह ३ दिवसांपासून आपला नंबर लागेल, याची प्रतीक्षा करत आहे. आमच्याकडे सर्व वैध दस्तऐवजही आहेत. मात्र आत सोडले जात नाही आहे. येथे सुरक्षितता नसल्याने आम्हाला बाहेर पडायचे आहे. आमच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. येथे राहिलो तर मरून जाऊ वा तालिबान मारून टाकेल. यापेक्षा येथून बाहेर पडण्याचाच प्रयत्न करणे बरे.’

पत्नी व ४ मुलांसह अमेरिकी दस्तऐवजांसाठी वाट पाहत बसलेली एक व्यक्ती म्हणाली, ‘आम्ही अनेक वर्षे अमेरिकींची सेवा केली. त्यांनी व्हिसा देण्याचे आश्वासन दिले होते. पण, आम्ही अडचणीत आल्याचे पाहताच त्यांची भूमिका बदलली.’ स्फोटांचे प्रत्यक्षदर्शी खलील शिनवारी म्हणाले, ‘तालिबानने शहरात जागोजागी नाके उभारले आहेत. ते लोकांना विमानतळावर जाण्यापासून रोखत आहेत. यामुळे स्फोटांनंतर अनेक कुटुंबांचा विचार बदलला आहे. ते आता पाकिस्तानात जाता यावे म्हणून पाक सीमेलगतच्या स्पिनबोल्डक भागाकडे जात आहेत. ते मुले व कुटुंबाला घेऊन काबूल बसस्टँडकडे धाव घेत आहेत. तेथेही शेकडो लोकांची गर्दी आहे.’

काबूलमध्ये अद्यापही काही लोक अडकलेले, स्थिती बदलत आहे : भारत
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते बागची म्हणाले, काबूलमधून बहुतांश भारतीयांना काढले आहे. अद्याप काही अडकलेले आहेत. मात्र आमच्याकडे अचूक आकडा नाही.

विमानतळाबाहेर एकच आत्मघाती हल्ला, दुसऱ्याची पुष्टी नाही: पेंटागॉन
१३ अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूनंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले, हल्लेखोरांना सोडले जाणार नाही. आम्हीही शिकार करू. पेंटागॉनने फक्त एका आत्मघाती स्फोटाला दुजोरा दिला आहे.

मृतांची संख्या वाढून ११०, उड्डाणे सुरू, मात्र अनेक देशांनी मोहीम रोखली
अफगाणिस्तानात विमानतळासमोर स्फोटांतील मृतांची संख्या ११० वर गेली आहे. ब्रिटन, इटली, स्पेनने लोकांना काढण्याची मोहीम रोखली आहे. संयुक्त राष्ट्राने हल्ल्याचा निषेध केला आहे.

बातम्या आणखी आहेत...