आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तान:तालिबानींनी सरकारी माध्यम प्रमुखाला ठार केले, गुरुद्वारावरून झेंडाही काढला

काबूल2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अतिरेक्यांकडून आता अल्पसंख्याकांना लक्ष्य करणे सुरू, भारताकडून निषेध

अफगाणिस्तानात तालिबानी अतिरेक्यांची ताकद वाढण्याबरोबरच त्यांचा रक्तरंजित खेळही वाढत चालला आहे. अितरेक्यांनी सरकारी माध्यम व माहिती केंद्राचे प्रमुख दावा खान मेनापाल यांची शुक्रवारी हत्या केली. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनीही याला पुस्ती देताना म्हटले की, शुक्रवारची नमा अदा करत असताना तालिबानने मेनापाल यांची हत्या केली. मेनापाल यांनी राष्ट्रपती अशरफ गनींच्या आउटरीच टीममध्ये प्रवक्ता म्हणून काम केले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार तालिबानींच्या एका प्रवक्त्याने म्हटले की, मेनापाल यांची हत्या मुजाहिद्दीनद्वारे केलेल्या एका हल्ल्यादरम्यान करण्यात आली. त्यांना त्यांच्या कर्मासाठी ही शिक्षा देण्यात आली. तर दुसरीकडे तालिबानने आता अफगानिस्तानात राहत असलेल्या अल्पसंख्यकांना लक्ष्य करणे सुरू केले आहे. पख्तिया प्रांतातील चमकनी क्षेत्रातील गुरुद्वारा थाला साहिब येथे अतिरेक्यांनी निशान साहिब (झेंडा) उतरवला. या गुरुद्वाराचे शीख समूदायात मोठे महत्त्व आहे. कारण शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक देवजी यांनी येथे दौरा केला होता. मागील वर्षी अफगाणिस्तानात हिंदू आणि शीख समुदायाचे नेते निदान सिंह सचदेवा यांचे पख्तिया प्रांतात अपहरण करण्यात आले होते. अफगाणिस्तान सरकार आणि समुदायातील ज्येष्ठांकडून केलेल्या प्रयत्नांनंतरही त्यांची मुक्तता केली नव्हती. या पूर्वी काबूलमध्ये एका पूजा स्थळावर इस्लामिक स्टेटच्या अतिरेकी हल्ल्यात शीख समुदायाचे सुमारे ३० लोक मारले गेले होते.

इकडे भारत सरकार या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. सरकारने म्हटले की, आम्ही निशान साहिबसंबंधी ऐकले आहे. आम्ही या घटनेची तीव्र निंदा करतो. अफगाणिस्तानात महिला आणि मुलांसह सर्वच वर्गाचे लोक सुरक्षित असावेत, असे आम्ही अफगाणिस्तानचे भवितव्य बघू पाहत आहोत.

तुर्कीत उपचार घेत असलेले दोस्तम काबूलला परतले
अफगाणिस्तानात तालिबानींच्या वाढत्या हल्ल्यांदरम्यान ‘मजार-ए-शरीफ का बूढ़ा शेर’ या नावाने प्रसिद्ध मार्शल अब्दुल रशीद दोस्तम काबूलला परतले आहेत. ६७ वर्षीय दोस्तम यांचे नाव ऐकूनच तालिबान योद्धे थरथर कापू लागतात, यावरून दोस्तम यांची काय ताकद आहे याचा अंदाज येतो. मार्शल अब्दुल रशीद दोस्तम अफगाणिस्तानच्या लोकशाही सरकारमध्ये २९ सप्टेंबर २०१४ ते १९ फेब्रुवारी २०२० पर्यंत उपराष्ट्रपती राहिले आहेत. काबूलला पोहोचताच त्यांनी तालिबानींना नेस्तनाबूत करण्याची शपथ घेतली आहे.

२४ तासांत ३०० हून अधिक तालिबानी आतिरेकी ठार
अफगाणिस्तानात तालिबानींचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी अफगाणी सेना निकराची झुंज देत आहे. २४ तासांतच ३०० वर तालिबानी अतिरेक्यांना सेनेने कंठस्नान घातले आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली. सेनेच्या या मोहिमेत ३०३ तालिबानी अतिरेकी मारले गेले तर १२५ जण जखमी झाले आहेत. अफगाणी सेनेने हे ऑपरेशन नांगरहार, लघमान, गजनी, पक्तिका, कंधारसह आजूबाजूंच्या परिसरात केले आहे.

बातम्या आणखी आहेत...