आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन दहशती:तालिबान ठार करेल किंवा उपासमार; कैदी तुरुंग चालवताहेत, भुकेसाठी लोकांवर भांडी विकण्याची वेळ

काबूल / नासिर अब्बास12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र काबूलच्या बाजारपेठेतील आहे. सामान्य लोक काही पैशांसाठी घरातील सामान विकू लागले आहेत. - Divya Marathi
छायाचित्र काबूलच्या बाजारपेठेतील आहे. सामान्य लोक काही पैशांसाठी घरातील सामान विकू लागले आहेत.

अफगाणिस्तान भीषण मानवी संकटातून वाटचाल करत आहे. परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. कैदी तुरुंग चालवू लागले आहेत आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लाेकांवर घरातील भांडीकुंडी विकण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाला जगवण्यासाठी घरातील फर्निचर व इतर सामान विकून आयुष्य काढणाऱ्या अनेकांना मी आेळखते, असे महिला मानवी हक्क कार्यकर्ता खदिजा अहमद यांनी सांगितले. काबूलच्या चमन-ए-हाेजरी, मजार-ए-शरीफ येथील बाजारपेठेत अशी भांडीकुंडी विकतानाचे चित्र सहजपणे दिसून येते. ही बाजारपेठ रेफ्रिजरेटर, कुशन, पंखेर, चादरी, चांदीची भांडी, कुकवेअर, अलमारी इत्यादी वस्तूंनी भरलेली दिसते. खदिजा यांच्या म्हणण्यानुसार लाेकांना दाेन प्रकारची भीती सतावू लागली आहे. पहिली भीती तालिबान ठार करेल अशी आहे. दुसरी दहशत उपासमारीची आहे. देशात सध्या तरी वाढत्या महागाईवर निगराणी करणारी यंत्रणा अस्तित्वात आलेली नाही. ९७ टक्क्यांहून जास्त अफगाणी लाेकसंख्या २०२२ च्या मध्यावर दारिद्र्य रेषेखाली जाण्याची शक्यता आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्राने दिला आहे.

तीनपैकी एक व्यक्ती तीव्र भुकेला ताेंड देतेय
विविध शहरांतील रेशन वितरण केंद्राबाहेर लांबच लांब रांगा दिसून येतात. संयुक्त राष्ट्रानुसार प्रत्येकी तीनपैकी एक अफगाणी उपासमारीचा मुकाबला करत आहे. २०२२ च्या मध्यापर्यंत ९७ टक्के लाेकसंख्या गरिबी रेषेखाली जाईल. आता ५० टक्के लाेकसंख्या गरिबी रेषेखाली आहे. अफगाणिस्तान परदेशी मदतीवर अवलंबून हाेता. पश्चिमेकडील बहुतांश एनजीआेंचे काम आता बंद झाले आहे. मजार-ए-शरीफ शहराचा रहिवासी शेतकरी मीर वाली म्हणाले, दाेन वर्षांपासून आम्ही दुष्काळाचा सामना करत आहाेत. आता खाण्यासाठी अन्न नाही.

परस्पर संघर्षात मुल्ला अली बरादरच्या खात्म्याचा दावा
तालिबानचे दाेन वरिष्ठ नेते अनेक दिवसांपासून दिसत नाहीत. तालिबानचे सर्वाेच्च नेते मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा व उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल अली बरादर जिवंत आहेत ना, असा प्रश्न काही पत्रकार व सामान्य लाेक विचारू लागले आहेत. अफगाणिस्तानवरील तालिबानच्या वर्चस्वानंतर अखुंदजादा दिसून आलेले नाहीत. अफगाणिस्तानच्या मंत्रालयाच्या वाटपावरून आपसात झालेल्या संघर्षात मुल्ला बरादर ठार झाला किंवा गंभीर झाल्याचा दावा आहे. तालिबानने मृत्यूचे खंडन केले आहे.

पंजशीरमध्ये तालिबानकडून निर्दाेष २० जणांची हत्या
तालिबानने पंजशीरमध्ये िनर्दाेष २० जणांची हत्या केली आहे. त्यात एका दुकानदाराचाही समावेश आहे. तालिबानी आल्यानंतरही ही व्यक्ती पळून गेली नाही. मी एक गरीब दुकानदार आहे. युद्धाशी काही संबंध नाही, असे त्याने सांगितले. परंतु तालिबानी दहशतवाद्यांनी सिम विक्रीचा आराेप करून त्यास अटक केली. त्यानंतर हत्या करून मृतदेह त्याच्या घराबाहेर फेकला. एका अन्य व्हिडिआेमध्ये तालिबानी पंजशीरच्या नाॅर्दर्न अलायन्समध्ये सामील व्यक्तीवर गाेळ्या झाडताना दिसून येतात.

बातम्या आणखी आहेत...