आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूल:तालिबानींचे आता क्रौर्य वाढले; यातना, लुटालूट सुरू, रसद संपल्याने नागरिकांची वाहने, अन्नधान्याची लूट, खंडणी वसुली

काबूल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र काबूल विमानतळाचे आहे. येथील गडबडीत दोन महिन्यांची निष्पाप हादिया रहेमानीची आईपासून ताटातूट झाली. आता तुर्कीश लष्करातील सैनिक हादियाचा आई-वडील होऊन सांभाळ करत आहेत. - Divya Marathi
छायाचित्र काबूल विमानतळाचे आहे. येथील गडबडीत दोन महिन्यांची निष्पाप हादिया रहेमानीची आईपासून ताटातूट झाली. आता तुर्कीश लष्करातील सैनिक हादियाचा आई-वडील होऊन सांभाळ करत आहेत.

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबानने सत्ता हाती घेऊन आठवडा लाेटला. आठवडाभरात काबूलबराेबरच कुंदुज, कंदहारपर्यंत नागरिकांमध्ये मारहाण, अपमान, अमानुष यातनांसह शिक्षेमुळे जास्त दहशत दिसते. तालिबानी दहशतवादी शहरे ताब्यात घेत चालले आहेत. परंतु त्यांच्याकडे खाद्यपदार्थांची व्यवस्था नाही. फिरण्यासाठी वाहनांत इंधनाची गरज असते. ही सुविधा दहशतवाद्यांच्या कमांडरने दिलेली नाही. त्यामुळे ते सामान्य नागरिकांचा छळ करत आहेत. नागरिकांच्या भाेजनाची व्यवस्था आणि तेल उपलब्ध करून दिले जावे, यासाठी तालिबानचे दहशतवादी दबाव टाकतात. भीतीमुळे कार्यालये बंद आहेत. लाेकांनी विनावेतन नाेकरीवर यावे अन्यथा परिणामांना ताेंड द्यावे लागेल, अशा धमक्याही तालिबानने दिल्या आहेत. महिलांचे दागिनेही तालिबान्यांनी लुटले. दहशतवाद्यांनी काेट्यवधींच्या खासगी व सार्वजनिक संपत्तीची लूट केली आहे. एका मुलाचे तालिबान दहशतवाद्यांनी अपहरण केले आहे. मुलाच्या सुरक्षेसाठी त्याची आई धडपडत आहे. तालिबान आपली पकड मजबूत करण्यासाठी नागरिकांना हिटलरच्या पद्धतीने यातना देत असल्याचे म्हटले जाते. तालिबानने मागील सरकारमधील सुरक्षा यंत्रणेतील अधिकाऱ्यांची आेळख पटवून त्यांची हत्या करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी दहशतवादी घरोघर जाऊन झडती घेत आहे. लोक घराबाहेर पडण्यासाठी घाबरू लागले आहेत. त्याचबरोबर घरात देखील सुरक्षित नसल्याची भावना लोकांमध्ये वाढली आहे. त्यामुळे अराजक परिस्थिती वाढू लागली आहे. मोठ्या देशांनी अफगाणिस्तानची आर्थिक मदत रोखल्याने तालिबानची रसद बंद पडली आहे. आता तालिबानने चीनसह अनेक देशांकडे हात पसरले आहेत.

अमानुषतेचा कहर : चविष्ट भाेजन बनवले नाही म्हणून महिलांना पेटवून दिले
महिलांना यातना

अफगाण महिलांना आता भाेजन चांगले बनवता आले नाही म्हणून लक्ष्य करण्यात आले आहे. तालिबानी दहशतवादी अफगाणी महिलांचे अपहरण करून त्यांना घरगुती काम करायला भाग पाडत आहेत. त्यांचे शाेषण करत आहेत. चविष्ट भाेजन बनवले नाही म्हणून महिलांना पेटवून देण्याच्या घटना क्राैर्य दाखवणाऱ्या आहेत. या घटनांत महिलांचा हाेरपळून मृत्यू झाला.

तालिबानींचा खात्मा
अफगाण सैनिकांनी तालिबानचा मुकाबला करताना ४० तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा केला. १५ जण जखमी झाले. तीन जिल्ह्यांवर नियंत्रण मिळवले आहे. पाेल-ए-हेसर, देह सालेह, कसान हे बगलान प्रांतातील तीन जिल्हे तालिबानमुक्त झाले आहेत.

गनीचा भाऊ तालिबानसोबत
देशातून पलायन केलेले माजी राष्ट्रपती अशरफ गनीचा भाऊ हशमतने तालिबानला पाठिंबा दिला आहे. कुचिस ग्रँड कौन्सिलचा प्रमुख हशमत गनी अहमदजाईने तालिबानी खलील-उर-रहेमन व मुफ्ती महेमूद जाकिरच्या उपस्थितीत तालिबानचे समर्थन केले.

१० हजार अडकले
काबूल विमानतळावर विविध देशांतील १० हजारांहून जास्त लाेक अडकले आहेत. जर्मनीने १६०० लाेक काढले आहेत. अमेरिका व अफगाणिस्तानचे नागरिकत्व असलेल्या लाेकांची संख्या ११ हजार ते १५ हजारांवर आहे. अमेरिकेकडे दरराेज ९ हजार लाेकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची क्षमता आहे. सध्या तरी अमेरिकेला दोन हजार जणांना हलवावे लागत आहे.

लोकांना काढण्यासाठी डेडलाइन वाढवावी; ब्रिटनची मागणी
दबाव
: रशियाच्या दौऱ्यावरील जर्मन चान्सलर अँजेला मर्केल रशियाच्या दौऱ्यावर आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी अफगाणिस्तानात अडकलेल्या हजारो लाेकांना सुरक्षित काढण्यासाठी मदत करावी. त्याचबरोबर तालिबानवर दबाव वाढवावा, अशी मागणी मर्केल यांनी केली आहे.

चिंता : अफगाणिस्तानात अडकलेल्या लाेकांना काबूल विमानतळाहून ३१ आॅगस्टपर्यंत काढणे कठीण काम आहे, असे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे डेडलाइन वाढवली पाहिजे. काबूल विमानतळावर नागरिकांशिवाय अमेरिकी-नाटाे सैन्याची मदत करणाऱ्यांनादेखील देशाबाहेर नेले जाणार आहे.

बचाव : काबूल विमानतळ सुरक्षित केल्याचे बायडेन यांनी स्पष्ट केले आहे. अफगाणिस्तानात ६ हजारांहून जास्त अमेरिकन सैनिक तैनात आहेत. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित काढले जाईल, असे आश्वासन बायडेन यांनी दिले. १४ आॅगस्ट राेजी आम्ही १३ हजार लाेकांना बाहेर काढले.

अमेरिकेला मदत करणाऱ्यांचातालिबानकडून वेगाने शाेध सुरू
तालिबानींच्या दहशतीमुळे काबूलमध्ये भयाण शांतता िदसते. अमेरिकन सैन्यासाेबत काम करणाऱ्या व आता भूमिगत झालेल्या लाेकांचा तालिबानने वेगाने शाेध घ्यायला सुरुवात केली आहे. तालिबानने अशा लाेकांची यादीही तयार केली आहे. अशा व्यक्तींचा शाेध घेण्यासाठी तालिबानी दहशतवादी मशिदींच्या संपर्कात आहेत. अफगाण सैन्य, पाेलिस, पत्रकार, गुप्तचर विभागांतील महत्त्वाच्या पदांवर हे लाेक कार्यरत हाेते. तालिबान या व्यक्तींना अटक करण्यासाठी माेठ्या संख्येने हेरांची भरती करत असल्याचे वृत्त आहे. संपूर्ण शहरात सर्वाधिक उलथापालथ काबूलच्या विमानतळावर आहे. येथे तहान-भुकेने व्याकूळ हजाराे लाेक देश साेडण्यासाठी धडपडू लागले आहेत. सात दिवसांपासून विमानतळ अमेरिका व तुर्की सुरक्षा दलाच्या ताब्यात आहे.

काबूलचे इस्माईल म्हणाले, सकाळी विमानतळावर पाेहाेचलाे तेव्हाचे चित्र वेगळेच हाेते. प्रत्येकाला देश साेडायचा आहे. काही जणांकडे आवश्यक कागदपत्रे आहेत, परंतु त्यापैकी बहुतांश लाेकांकडे वैध कागदपत्रे नाहीत. विमानतळाबाहेर सातत्याने घाेषणा केली आहे. कागदपत्रांविना प्रवेश करू नका, अशी सूचना त्यावरून दिली जात आहे. सगळ्यांना परदेशात घेऊन जाणे शक्य नाही, तरीही लाेक परदेशात जाण्यासाठी अडून आहेत. अफगाणिस्तानातील महिलांना मिळणारी वागणूक संतापजनक आहे. महिला पत्रकार नसरीनने साेशल मीडियावर भावना व्यक्त केल्या. काबूलवर तालिबानने वर्चस्व मिळवल्यानंतर मी आयुष्यातील सर्वात भीतिदायक दिवस पाहिले आहेत. महिला, मुले, पुरुषांना मारहाण केली जात आहे. चाैकीवरील तैनात तालिबानी दहशतवादी अत्यंत मग्रूर आणि क्रूर आहेत. ते कुणालाही कधीही गाेळी मारू शकतात. एका विद्यार्थिनीने हातावर टॅटू गाेंदवला हाेता. म्हणून तिला तालिबानच्या दहशतवाद्यांनी अमानुषपणाने मारहाण केली हाेती.

बातम्या आणखी आहेत...