आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेलबर्न:ऑस्ट्रेलियात तंजावूरच्या धर्तीवर बनले ग्रॅनाइटचे सर्वात माेठे मंदिर

मेलबर्न / अमित चौधरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लिट्टेला घाबरून पळालेल्या तामिळ हिंदूंनी 20 काेटी खर्चून केली पुनर्निर्मिती

मेलबर्नमधील श्री वक्रतुंड विनयगर मंदिर हे भारताबाहेरचे पृथ्वीच्या दक्षिण गाेलार्धातील एकमेव मंदिर आहे, जे ग्रॅनाइटच्या दगडाने बनवण्यात आले आहे. गणपतीचे हे मंदिर नुकतेच नव्या रूपात पुन्हा उघडले गेले. या मंदिराची रचना जागतिक वारसा असलेल्या तंजावूरच्या बृहदीश्वर मंदिरावरून करण्यात आली आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष बाळा कांडिया म्हणाले, मंदिराचे बांधकाम गेल्या वर्षी जूनमध्ये संपणार होते, परंतु कोरोना विषाणूमुळे ते पुढे ढकलले गेले. यासाठी २० कोटी रुपये खर्च झाला आहे. येथे गणेश मंदिराशिवाय इतर देवतांची ११ मंदिरेही बांधण्यात आली आहेत.

मूर्ती खरेदीसाठी पैसे नव्हते, शंकराचार्यांच्या दाेन विटांनी पायाभरणी
श्री वक्रतुंड विनयगर मंदिराच्या व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष बाळा कांडिया म्हणाले, १९८८ मध्ये श्रीलंकेत गृहयुद्ध सुरू होताच तामिळी हिंदूंना देश सोडून जावे लागले. त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये आश्रय घेतला. मेलबर्नमध्ये दक्षिण भारतीय मंदिर नसल्याने लाेकांनी मंदिर बांधण्याचा संकल्प साेडला. पण कुणाकडेही पैसे नव्हते. मंदिराचे विद्यमान सचिव शान पिल्लई यांनी ही मूर्ती तामिळनाडूमधून आणली. नंतर देणग्या मिळाल्या. १९९० मध्ये मेलबर्नच्या पूर्वेकडील भागात जमीन खरेदी केली गेली. १९९१ मध्ये कांचीपुरमच्या शंकराचार्यांनी दिलेल्या विटांनी मंदिराची पायाभरणी झाली.

३५० टन ग्रॅनाइटचा वापर
- ३५० टन ग्रॅनाइटचे १,२०० वेगवेगळे दगड, एकावर एक असे १७ स्तर
- सगळ्यात लहान दगडाचे वजन २५० किलाे, सर्वात जड ६ टनांचा
- तामिळनाडूतल्या महाबलिपुरमच्या १०० शिल्पकारांनी ग्रॅनाइट दगड काेरला, नंतर आॅस्ट्रेलियाला पाठवला. डिझाइनसाठी आयआयटी मद्रासचे प्राध्यापक अरुण आणि चेन्नईच्या उमा नरसिंहन यांचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...