आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चिनी संशोधकांनी ताज्या संशोधनात दावा केला आहे की, टॉयलेट फ्लश केल्यानेही कोरोना संसर्ग पसरू शकतो. यामुळे फ्लशच्या आधी टॉयलेट सीट झाका. कोरोना पचनसंस्थेतही जिवंत राहू शकतो आणि शौचातून बाहेर येऊ शकतो. संशोधन करणाऱ्या चीनच्या येंगझाऊ विद्यापीठाच्या संशोधकांचे म्हणणे आहे की, टॉयलेटला फ्लश केल्याने कोरोनाचे कण हवेत जाऊ शकतात आणि संसर्ग करू शकतात. संशोधकांनुसार टॉयलेट जेवढे जास्त वापरले जाईल तेवढा जास्त धोका राहील. फ्लशच्या वेळी पाणी, हवा मिळून हालचाल होते आणि त्यामुळे विषाणू व जिवाणू पसरू शकतात. विशेषत: ज्या घरात जास्त सदस्य आहेत तेथे. ‘फिजिक्स ऑफ फ्लूइड’ जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार फ्लश केल्याने टॉयलेट सीटला काय होते हे संशोधकांनी एका कॉम्प्युटर मॉडेलने समजावले आहे. दोन प्रकारच्या टॉयलेटवर संशोधन झाले. पहिले सिंगल व्हॉल्व्हचे होते तर दुसरे डबल व्हॉल्व्हचे होते, जो पाणी वेगाने टाकतो. संशोधकांचे म्हणणे आहे की, फ्लश केल्याने हवेत दबाव निर्माण होतो आणि त्यातून विषाणूचे ड्रॉपलेट्स सीटपासून ३ फूट उंच जातात. हे ड्रॉपलेट्स खूप लहान असतात आणि हवेत एक मिनिटांपर्यंत राहू शकतात. ते श्वास घेताना किंवा जवळच्या पृष्ठभागाला स्पर्श केल्याने बाधित करू शकतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.