आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकाच प्रकारची सही करणे कंटाळवाणे होऊ शकते. आता तर हस्ताक्षराचीही कॉस्मेटिक शस्त्रक्रिया होत आहे. डॉक्टर, वकील व प्रसिद्ध व्यक्ती विशेषत: आपली स्वाक्षरी विशिष्ट पद्धतीने करण्यासाठी कॉस्मेटिक शस्त्रक्रियेचा मार्ग निवडत आहेत. यासाठी ते सुलेखनकाराची सेवा घेत आहेत.
लॉस एंजिलिसमध्ये प्रिसिला मोलिना असेच एक कॅलिग्राफर आहेत जे स्वाक्षरी डिझाइन करतात. महिनाभरात त्यांच्याकडे जवळपास ३०० ग्राहक येत आहेत. ते स्वाक्षरीच्या कॉस्मेटिक शस्त्रक्रियेत आपल्या पॅकेजमध्ये ठरलेल्या किमतीच्या बदल्यात डिझाइन प्रस्तावित करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, आपली स्वाक्षरी बदलू इच्छिणारे व्यावसायिक व प्रसिद्ध व्यक्ती आमचे ग्राहक आहेत. प्रसिद्ध लोक आपल्या ऑटोग्राफला नवा लुक देऊ इच्छितात. स्वाक्षरी बदलण्याच्या इच्छेमागे ते एकच कारण मानतात की, लोकांना तीच तीच स्वाक्षरी करून कंटाळा येतो. मोलिना म्हणतात की, ते आपल्या स्वाक्षरीवर समाधानी नाहीत. सध्याची स्वाक्षरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळत नाही. त्यांना जगाला जो संदेश द्यायचा असतो तो सध्याच्या स्वाक्षरीशी मिळताजुळता नाही.
मिसौरीमध्ये सेंट लुईमध्ये स्वाक्षरीच्या कॉस्मेटिक सर्जन सोनिया पलामंद म्हणाल्या, ही लाेकांना नव्या पद्धतीने शोधण्याची पद्धती आहे.
रोज सराव केल्यास नव्या स्वाक्षरीत तीन दिवसांत नैपुण्य कॅलिग्राफर्सच्या म्हणण्यानुसार, १५ ते २० मिनिटे रोज सराव केल्याने लोक तीन दिवसांत आपली नवी स्वाक्षरी करण्यात यशस्वी होतात. नवे काही करण्यात तुम्ही किती रस घेता यावर बरेच अवलंबून आहे. ग्राहकांना याच्या टेम्पलेटवर अभ्यास करण्यास सांगितले जाते. सतत सराव केल्याने स्वाक्षरीला नवा लुक मिळतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.