आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जो बिरी
वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या माया मोंटोया यांच्यासाठी ‘साँग ऑफ द इयर’ राहिले व्हाइट नॉइस. विशेषत: स्पॉटिफाय या डिजिटल म्युझिक प्लॅटफॉर्मचे ‘सेलिस्टियल व्हाइट नॉइस.’ हे तीन तासांचे शांत संगीत आहे. २७ वर्षीय मोंटोया म्हणाल्या की, अलीकडेच स्पॉटिफायने जेव्हा आपल्या वर्षाचा रॅप्ड चार्ट जारी केला तेव्हा मला आश्चर्य वाटले. त्यांच्या चार्टमध्ये सेलिस्टियल व्हाइट नॉइस अव्वल स्थानी होते. नंतर अशा शेकडो लोकांनी सांगितले की, आमच्या टॉप चार्टमध्ये या वेळी व्हाइट नॉइसशी संबंधित संगीत अव्वल राहिले. व्हाइट नॉइस म्हणजे शांत ध्वनी, ते झोपण्यास मदत करतात. स्पॉटिफायवर या वर्षी बॅकग्राउंड साउंड, शांत संगीताची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनामुळे लोकांची चिंता वाढली तेव्हा यू ट्यूबवर झोपेशी व निसर्गाशी संबंधित ध्वनी, झोपण्याची वेळ याच्याशी संबंधित शब्दांद्वारे सर्वाधिक सर्चिंग करण्यात आले. चीनमध्ये २० कोटी लोक रात्री संगीत एेकतात. एंडेल अॅपच्या डाऊनलोडमध्ये गेल्या ऑगस्टपर्यंत ८०% वाढ झाली. हे अॅप आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने ध्वनी बनवते. अशाच प्रसिद्ध असलेल्या काम (Calm) या अॅपची डाऊनलोड संख्या ऑगस्टमध्ये दुप्पट झाली.
1. व्हाइट नॉइस म्हणजे काय?
व्हाइट नॉइस मनाला आराम देणारा आणि शांत करणारा ध्वनी असतो, तो झोप येण्यास मदत करतो. हे गाणे नसते, तर तो नैसर्गिक किंवा तयार केलेला ध्वनी असतो, तो जास्त आवाज असलेल्या सुरांवर ओव्हरलॅप करतो आणि आराम देतो. विज्ञानात एखाद्या ध्वनीची फ्रिक्वेन्सी आणि अॅम्प्लिट्यूडच्या संबंधाच्या आधारावर त्याला वेगवेगळ्या रंगांची नावे देतात.
2. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले का?
अशाच प्रकारे पिंक नॉइस, ब्राऊन नॉइस आदीही असतात. विविध अभ्यासांत व्हाइट नॉइस झोपेसाठी चांगला असतो, असे सांगण्यात आले आहे. २०१८ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रेसमध्ये प्रकाशित अभ्यासात म्हटले आहे की, व्हाइट नाॅइस एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवतो, झोप चांगली येते. या वर्षी दक्षिण कोरियात झालेल्या एका अभ्यासात म्हटले आहे की, असे ध्वनी ऐकल्यास तणाव कमी होतो. ते स्मृतिभ्रंश या आजारातही उपयुक्त आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.