आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • The Two Countries Will Hold A Second Meeting At The Lieutenant General Level In Moldo India China Ladakh Border News Update June 22

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गलवान चकमकीनंतर भारत-चीनची आज उच्चस्तरीय बैठक:मॉल्डोमध्ये लेफ्टनंट जनरल लेव्हलची दुसऱ्यांदा चर्चा, लडाख सीमेवरील तणाव कमी करणे हा मुद्दा महत्त्वाचा

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती, सीनी सैनिकांनी काटेरी दंड्यांनी हल्ला केला होता
  • भारताचे 20 जवान या हल्ल्यात शहीद झाले होते, चीनचेही 40 पेक्षा जास्त सैनिक मारले गेले होते, मात्र त्यांनी अद्याप संख्या सांगितलेली नाही ट

भारत आणि चीन यांच्यात सोमवारी मॉल्डो येथे कमांडर लेव्हलची चर्चा होणार आहे. 15 जूनच्या रात्री गलवानमध्ये दोन्ही देशांमध्ये चकमकी झाल्यानंतर हे पहिले संभाषण आहे. साहजिकच यात लडाख सीमेवरील ताण कमी करण्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. गलवानमधील चकमकीत चिनी सैनिकांनी काटेरी तारांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता. त्यात 20 सैनिक शहीद झाले होते. चीनचे 40 हून अधिक सैनिकही ठार झाले. मात्र चीनने अद्याप त्यांचे सैनिक मारले गेल्याविषयी कोणतेही भाष्य केलेले नाही.

या महिन्यात भारत चीनच्या 3 बैठका झाल्या

पहिली : 6 जून

कुठे झाली : चुशुल सेक्टरमध्ये चीनच्या सीमेवरील नियंत्रण रेषेपासून 20 किमी अंतरावर मोल्डो येथे घडली. कोणत्या स्तरावरील संवाद: लेफ्टनंट जनरल लेव्हल. काय चर्चा झाली  : हा वाद शांततेत सोडवून नात्यास पुढे आणले पाहिजे.

दुसरी: 10 जून

कुठे झाली : पूर्व लडाखजवळील भारतीय सीमेच्या आत. कोणत्या स्तरावरील संवाद: मेजर जनरल स्तर  काय चर्चा झाली : सीमा विवाद सोडवावा आणि सैन्याची संख्या कशी कमी करावी

तिसरी: 12 जून

कुठे झाली: स्थान माहित नाही. कोणत्या स्तरावरील संवाद: मेजर जनरल स्तर  काय चर्चा झाली : गलवान परिसरातील तिन्ही जागांवरील वाद कसा सोडवता येईल 

बातम्या आणखी आहेत...