आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गांधीजींच्या चष्म्याची 2.55 कोटीत विक्री:ब्रिटनमधील लिलावघराने दीड लाख रुपये मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती, चष्म्याच्या मालकाने म्हटले होते - चष्मा न आवडल्यास फेकून द्या

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महात्मा गांधींनी 1920 किंवा 1930 च्या दशकात ब्रिटीश पेट्रोलियममध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला चष्मा दिला होता

ब्रिटनमधील एका लिलावात महात्मा गांधींचा गोल्ड प्लेटेट चष्मा 2.6 लाख पाउंड (जवळपास 2.55 कोटी रुपये)मध्ये विकला गेला. शुक्रवारी विक्री झाल्यानंतर ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन हाऊसने इन्स्टाग्रामवर सांगितले की 4 आठवड्यांपूर्वी आमच्या लेटरबॉक्समध्ये आम्हाला हा चष्मा मिळाला होता. कोणीतरी तो तेथे ठेवला होता. चष्मा ठेवून जाणाऱ्या व्यक्तीच्या काकाला स्वतः गांधींजींनी हा चष्मा भेट स्वरुपात दिला होता.

गांधीजी आपल्या वस्तू अशा लोकांना द्यायचे, ज्यांना त्या वस्तूंची अधिक आवश्यकता असायची. ऑक्शन हाऊसनुसार गांधीजींनी 1920 किंवा 1930 च्या दशकात दक्षिण आफ्रिकेत ब्रिटीश पेट्रोलियममध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला हा चष्मा दिला होता. लिलावात चष्म्याला 15 हजार पाउंड (अंदाजे दीड लाख रुपये) मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.

'तुम्हाला चष्मा न आवडल्यास फेकून द्या'

लिलावकर्ते अँड्र्यू स्टोव्ह नावाच्या व्यक्तीने ज्या व्यक्तीकडे चष्मा होता त्याच्याशी झालेल्या बातचीतचा खुलासा केला आहे. त्या व्यक्तीने म्हटले की, जर त्यांना तो चष्मा चांगला न वाटल्यास त्याला फेकून देऊ शकता. स्टोव्ह यांच्यानुसार, जेव्हा मी त्यांना या चष्म्याच्या लिलावातून 15 हजार पाउंड मिळाल्याचे सांगितले, तेव्हा ते चकित झाले.