आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंजुरी:यूएनच्या अधिसूचना आता हिंदी भाषेतही जारी होणार; भारताच्या प्रस्तावाला यूएनजीएने दिली मंजुरी

न्यूयॉर्क14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​संयुक्त राष्ट्राच्या अधिसूचना आता हिंदी भाषेतही जारी होणार आहेत. भारताच्या याबाबतच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्र महासभेने (यूएनजीए) मंजुरी दिली आहे. यामुळे पहिल्यांदाच युएनच्या अधिसूचना हिंदीत जारी होतील. युएनजीएने बांगला आणि उर्दू भाषेचाही समावेश केला आहे. संयुक्त राष्ट्राचे सर्व कामकाज आणि आवश्यक संदेश या भाषांमध्येही जारी केले जातील.

अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश या युएनच्या ६ अधिकृत भाषा आहेत. यामध्ये इंग्रजी आणि फ्रेंच मुख्य आहेत. युएन महासभेचे भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत टी. एस. तिरूमूर्ती म्हणाले, या वर्षी पहिल्यांदा प्रस्तावात हिंदी भाषेचा समावेश केला आहे. त्यात बांगला आणि उर्दूचाही उल्लेख आहे. ते म्हणाले, भारत २०१८ पासून युएनच्या जागतिक संवाद विभागासोबत भागीदारी करत आहे. संयुक्त राष्ट्राचे वृत्तपत्र आणि मल्टीमीडिया कंटेंट हिंदी भाषेत जारी करण्यासाठी निधीही देत आहे. यूएनमध्ये २०१८ मध्ये हिंदी प्रकल्पाला सुरुवात झाली होती. हिंदी भाषेत युएनची पोहोच वाढवणे आणि हिंदी भाषिकांना जास्तीत जास्त साहित्य हिंदीत देणे हा याचा उद्देश होता.

बातम्या आणखी आहेत...