आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आईच्या आहारातील स्वादानुसार गर्भातील बाळ प्रतिक्रिया देते, चव कडू लागली तर रडवेले हाेते

लंडन14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आईच्या गर्भातही बाळाला चव लक्षात येते. गरोदरपणात आईच्या आहारावरून बाळाची चव घेण्याची पद्धत निश्चित होते. ब्रिटनमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, पहिल्यांदाच जन्म न झालेल्या बाळाच्या हावभावाची नोंद करण्यात आली. २४ ते ३४ आठवड्यांच्या गरोदर महिलांवर करण्यात आलेल्या या अभ्यासात गाजरयुक्त कॅप्सूलची चव घेणाऱ्या आईच्या गर्भात वाढणारे भ्रूण हसताना दिसले. दुसरीकडे, कोबीची कॅप्सूल दिल्यानंतर त्याने/तिने रडतानाचे किंवा ओरडण्याचे भाव व्यक्त केले. या अभ्यासात १०० गरोदर महिलांच्या गर्भावस्थेतील बाळांच्या प्रतिक्रियेतील फरक नोंदवला. डरहम विद्यापीठाच्या संशोधकांनी ३४ महिलांना १०० ग्रॅम कापलेल्या कोबीची पावडर कॅप्सूल दिली. ३५ महिलांना गाजराची कॅप्सूल दिली. तर ३० जणींना काहीच दिले नाही. २० मिनिटांनंतर अल्ट्रासाउंडमध्ये दिसून आले की कोबीची कॅप्सूल आईच्या पोटात जाऊन बाळाला त्याचा स्वाद जाणवताच बहुतांश बाळांचे चेहरे ताणले गेले. तर, ज्या महिलांना गाजर दिले होते त्यांच्या पोटातील बाळ हसताना दिसून आले. ज्या महिलांना काहीच दिले नव्हते त्यांच्या पोटातील बाळांच्या चेहऱ्यावर वेगळी अशी कोणतीही प्रतिक्रिया दिसली नाही.

गर्भाशयाच्या बाहेरही नोंदवल्या भावमुद्रा गर्भात असलेल्या बाळावर आईच्या खाण्यापिण्याचा अन् वागणुकीचा परिणाम होतो. गर्भाशयातील भ्रूणाची ही भावमुद्रा प्रथमच नोंदवली गेली. यापूर्वी सन २००१ मध्ये एका अभ्यासात आईच्या दुधाच्या माध्यमातून बाळाला गाजराची चव देण्यात आली. तेव्हा इतर खाद्यपदार्थंाच्या तुलनेत बाळाच्या कमी भावमुद्रा उमटल्या. परंतु हे निरीक्षण गर्भाशयाबाहेरील बाळावर करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...