आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावरून संघर्ष:ट्रम्प समर्थक नऊ खासदारांनी चीनवरनिर्बंध लादण्यासाठी मांडले विधेयक, मंजूर झाल्यास चीनवर ५ प्रमुख निर्बंध शक्य

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • अमेरिकेने चीनला घेरण्याची सुरू केली तयारी

(डेव्हिड ब्रुन्नस्ट्रॉम / अलेक्झांड्रा)

चीनवर निर्बंध लावण्यासाठी अमेरिकेने कंबर कसली आहे. त्यासाठी संसदेत एक विधेयक सादर करण्यात आले आहे. हे विधेयक ९ खासदारांच्या समूहाने पटलावर मांडले आहे. त्यात चीन काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासंबंधी कारवाई करत नसल्यास तसेच नियंत्रणाबाबत सहकार्य करत नसल्यास अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना चीनवर निर्बंध लादण्याची परवानगी दिली जावी, अशा आशयाचा मसुदा आहे. राष्ट्राध्यक्ष ६० दिवसांत या आराेपासंबंधी ठोस पुरावे पडताळून त्याला निश्चित करतील. चीनने अमेरिका तसेच सहकारी देश किंवा जागतिक आरोग्य संघटनेसारख्या संयुक्त राष्ट्राशी संबंधित संस्थांना कोरोनाबाबत संपूर्ण माहिती देतील. चीनने मांसाहाराची विक्री करणारी सर्व बाजारपेठ बंद केली होती. त्याद्वारे जनावरांतून माणसांत विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका वाढला होता. हे विधेयक लिंडसे ग्रॅहम यांनी सादर केले होते. इतर आठ खासदारांनी या विधेयकाचे समर्थन केले होते. हे सर्व खासदार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय मानले जातात. ग्रॅहम म्हणाले, चीनने चौकशीसाठी परवानगी देण्यास नकार दिला. त्यामुळेच हे विधेयक आणणे गरजेचे होते. चीनवर दबाव वाढवण्यात आला नाही तर चीन चौकशीत कधीही सहकार्य करणार नाही. अमेरिकेतील या विधेयकात हाँगकाँगच्या लोकशाही समर्थकांची महामारीच्या काळात तुरुंगातून सुटका करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) रॉबर्ट आे ब्रायन यांनीही याबाबत माध्यमांशी संवाद साधला. २० वर्षांत चीनमध्ये पाच महामाऱ्या आल्या. महामारीला कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत रोखणे गरजेचे आहे. जगभरातील लोकांनी चीनच्या विरोधात वज्रमूठ दाखवली पाहिजे. आम्ही चीनमधून येणाऱ्या महामारीला सहन करणार नाही.

हे विधेयक मंजूर झाल्यास चीनवर ५ प्रमुख निर्बंध शक्य

> चिनी कंपन्यांना अमेरिका कर्ज देणार नाही

>चीनवर प्रवासासंबंधी निर्बंध.चिनी नागरिकांचा व्हिसा रद्द हाेऊ शकताे.

>अमेरिका चीनची संपत्ती सील करू शकेल.

>चिनी कंपन्या अमेरिकी शेअर बाजारातून बाहेर पडतील.

> चीनी कंपन्यांना अमेरिका कर्ज देणार नाही. 

बातम्या आणखी आहेत...