आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविश्वविख्यात ऑक्सफर्ड विद्यापीठ केवळ प्रतिष्ठितच नाही तर ते श्रीमंत संस्थांपैकी एक मानले जाते. त्याच्याकडे ६४० अब्ज(६.४ अब्ज पाउंड) दानाची रक्कम आहे. २०२०-२१ मध्ये ऑक्सफर्डला ८० कोटी पाउंडचा संशोधन निधी प्राप्त झाला आहे. हा कोणत्याही ब्रिटिश विद्यापीठात सर्वात जास्त होता. मात्र, कंत्राटी फॅकल्टी वाईट सेवा, अटी आणि कमी वेतनासारख्या समस्यांशी झगडत आहे. अनेक वर्षांपर्यंत अशा स्थितीत काम केल्यानंतरही प्राध्यापक नियमित केले नाहीत. वेतन किमान उत्पन्नासमान आहे. ब्रिटनच्या २०१९-२० च्या उच्च शिक्षणाच्या आकडेवारीनुसार, एकूण अकॅडमिक स्टाफमध्ये एक तृतीयांश तात्पुरते निश्चित अवधीसाठी कंत्राटावर आहेत. ऑक्सफर्डमध्ये हे दोन तृतीयांश आहे. कंत्राटाच्या अटीत शिक्षणाच्या तासांनुसार, पेमेंट केले जाते. मात्र, एका तासाच्या शिक्षणासाठी प्राध्यापकांना तीन ते चार तास तयारी करावी लागते,ज्याचा पेमेंटमध्ये समावेश नाही. त्यांना एक तास शिकवण्यासाठी २५ पाउंड मिळतात. मात्र, ते तयारीसाठी ४ तास देतात. याच पद्धतीने त्यांना किमान वेतन १०.४२ पाउंड प्रति तासापेक्षाही कमी होते. संस्था स्वत:ही मानते की, एका अंडरग्रॅज्युएट वा पोस्ट ग्रॅज्युएटला सामान्य जीवन जगण्यासाठी वार्षिक १४,६०० ते २१,१०० पाउंडची गरज असते. १५ वर्षांपासून कंत्राटावर ऑक्सफर्डशी संबंधित एका प्राध्यापकाने सांगितले की, लेक्चरर स्टायपन्ड ब्रिटनच्या सरासरी वेतनापेक्षाही कमी आहे.
नोव्हेंबरमध्ये प्राध्यापकांचा सर्वात मोठा संप
गेल्या नोव्हेंबरमध्ये ऑक्सफर्डसह १५० संस्थांतील ७० हजार प्राध्यापकांनी चांगल्या अटींसाठी तीन दिवसांचा संप केला. उच्च शिक्षणाच्या इतिहासात हा सर्वात मोठा संप होता. फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्टचा मुद्दाही त्यांनी उचलला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.