आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका:हॅकर्सना 36 कोटी रुपयांची खंडणी देऊन अमेरिकी कंपनीने सोडवली आपली पाइपलाइन

मायकेल डी शियर, निकोल पर्लरोथ| वॉशिंग्टन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हॅकर्स ग्रुप डार्कसाइडने केली सायबर वसुली, ग्रुप पूर्व युरोपच्या देशांतून संचालित

अमेरिकेतील महत्त्वाची तेल पाइपलाइन कोलोनियलची हॅकर्सच्या तावडीतून सुटका करण्यासाठी त्याच्या संचालकांनी जवळपास ५० लाख डॉलरची(३६ कोटी रु.) खंडणी दिली. हे पेमेंट ७५ बिटकॉइनच्या रूपात दिले. यानंतर पाइपलाइनने तेलपुरवठा होऊ शकला.

टेक्सासहून न्यू जर्सीपर्यंत विस्तारलेल्या या पाइपलाइनद्वारे अमेरिकेतील मोठ्या भागात तेलपुरवठा होतो. अटलांटिक किनाऱ्यापर्यंत वाहतूक इंधनाचा निम्मा पुरवठा या पाइपलाइनने होतो. याचे संगणक हॅकर्सच्या ताब्यात आल्यानंतर गोंधळ उडाला होता. कंपनीने आपली पाइपलाइन बंद केली होती. यानंतर अमेरिकेत पेट्रोल-डिझेलचे संकट वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. पेट्रोल पंपांवर लांब रांगा लागल्या होत्या. इंधनटंचाईमुळे अनेक एअरलाइन्सने लांब पल्ल्याची अनेक विमाने रद्द केली. व्हाइट हाऊसमध्ये आपत्कालीन बैठक बोलवावी लागली होती. पेट्रोल-डिझेलचे संकट पाहता राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अमेरिकी लोकांना पेट्रोल-डिझेलचा साठा न करणे व पंपांना दरवाढ न करण्याचा इशारा दिला होता.

अमेरिकी सायबर तज्ज्ञ या ग्रुपवर प्रत्युत्तराचा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिवांनी सांगितले की, प्रशासन यासाठी युनायटेड स्टेट सायबर कमांडच्या शिफारशीची प्रतीक्षा करत आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या कार्यकाळात सरकार आणि उ्दयोगाविरुद्ध सायबर हल्ल्यांत वाढ नोंदली आहे. कोलोनियल पाइपलाइन कंपनीमार्फत खंडणी देऊन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी तेलाच्या वाढत्या किमती व पंपांवरील रांगांचे संकट तूर्त दूर केले आहे. यामुळे संबंधित गुन्हेगारी समूहांचे धाडस बळावले जाईल.

रॅनसमवेअर नावाच्या मालवेअरचा केला होता वापर

कोलोनियल कंपनीच्या बिझनेस नेटवर्कची हॅकिंग डार्कसाइड नावाच्या हॅकिंग ग्रुपने केली होती. त्यामुळे रॅनसमवेअर नावाच्या मालवेअरचा वापर केला होता. हे सॉफ्टवेअर डेटा सांकेतिक भाषेत रूपांतरित करतो. जोवर खंडणीची रक्कम दिली जात नाही, तोवर त्याच्या संगणकावर हॅकर्स कब्जा करतात. डार्कसाइड नावाचा हा हॅकर्सचा ग्रुप पूर्व युरोपमधून संचालित होतो, असे मानले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...