आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका:महामारीला राेखण्यामध्ये अमेरिकी सरकारला अपयश, आेबामा यांनी केली ट्रम्प सरकारवर टीका

वाॅशिंग्टनएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • आपली जबाबदारी निभावणे त्यांना जमत नसल्याची ओबामा यांची टीका

जागतिक महामारीला राेखण्यात व त्याच्या उच्चाटनात अमेरिकेतील सरकारला अपयश आले आहे, अशा शब्दांत माजी राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी ट्रम्प सरकारच्या धाेरणावर टीका केली.

कृष्णवर्णीय महाविद्यालये व विद्यापीठाच्या एेतिहासिक महती सांगणाऱ्या व्हिडिआे संमेलनाच्या निमित्ताने काेणाचाही नामाेल्लेख न करता आेबामा यांनी हा आराेप केला. जबाबदार लाेक काय करत आहेत? हे आताच्या परिस्थितीत दिसून आले आहे. आपली जबाबदारी निभावणे त्यांना जमत नसल्याची टीका त्यांनी केली. महामारीने सर्वकाही बदलून टाकले आहे.

आपल्या देशात आर्थिक असमानतेसारख्या समस्येपासून वांशिक भेदभाव इत्यादी समस्या आणखी गंभीर रूप धारण करू लागल्या आहेत.

आपल्याला पर्यावरणाचा बचाव भविष्यातील महामारीला पराभूत करायचे असल्यास आपण एकजूट झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. ट्रम्प यांचा नामोल्लेख न करता आेबामा यांनी गेल्या आठवड्यातही सरकारच्या कामकाजावर टीका केली होती.

बातम्या आणखी आहेत...