आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉशिंग्टन:अमेरिकन लष्कराची ‘अँटी एजिंग’ गोळी वृद्धत्व येऊ देणार नाही; कार्यक्षमता वाढेल, गंभीर जखमींना लवकर बरे करण्यातही मदत

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकी सेना एका अशा गोळीची चाचणी घेत आहे, जी वाढते वय रोखेल. ही अॅँटी एजिंग गोळी जखमही लवकर बरी होण्यास मदत करेल. ही औषधी अमेरिकी सेनेच्या ‘स्पेशल ऑपरेशन कमांड’ने (सोकोम) तयार केली आहे. अमेरिकी संरक्षण मंत्रालय आपल्या सैनिकांची कार्यक्षमता वाढवत असल्याचे सांगितले जात आहे. हे संशोधन मानवी कार्यक्षमतेत सुधारणेच्या पेंटागॉन प्रकल्पाचा भाग आहे. या औषधाने एक कंपाउंड ‘निकोटिनामाइन एडेनिन डायन्युक्लिओटाडइ’चा (एनएडी+) स्तर वाढतो, असा दावा आहे. यामुळे सूज आणि न्यूरो-डीजेनेरेशन (नर्व्हस सिस्टिम कमकुवत होेणे) मध्ये घट आणण्यात यश मिळू शकते. सोबतच पेशी पुन्हा तरुण होतात. या औषधी प्रकल्पाशी निगडित आणि स्पेशल ऑपरेशन फोर्सेसमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे डायरेक्टर लीसा सेंडर्स यांच्या मते या औषधीत वार्धक्याची गती कमी करण्याची आणि जखम गंभीर होण्यापासून रोखण्याची अलौकिक क्षमता असेल. ही औषधी बनवण्यासाठी अमेरिकी सेना खासगी बायोटेक लॅब मेट्रो इंटरनॅशनल बॉयोकेमसोबत करार करत आहे.

सोकोमचे प्रवक्ते टीम हॉकिन्स यांनी म्हटले की, या पेशींचा अर्थ पूर्वीपासूनच नैसर्गिकरीत्या तयार शारीरिक क्षमता निर्माण करणे नव्हे, तर सेनेच्या मोहिमांची तयारी आणि क्षमता वाढवणे आहे. या पेशी वयोमानानुसार कमी होतात. हॉकिन्स यांच्या मते, या औषधीचा वापर सैनिक आणि सामान्य जनतेसाठीही करता येईल. औषधीमुळे गंभीर जखमही लवकर भरेल आणि लोक अपेक्षेपेक्षाही लवकर बरे होतील. ते आपल्या कामावरही लवकर परतण्यास सक्षम होतील.

या औषधीतील घटक न्यूट्रास्युटिकल्स असे आहे की ते खाद्यपदार्थातून मिळवले जाते. यात पोषकतत्त्वे, खनिजासोबतच औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. फोर्टिफाइड डेअरी उत्पादन आणि अँटिऑक्सिडेंट एडिटिव्हज याच श्रेणीत मोडतात. संशोधनकर्त्यांना अॅनिमल क्लिनिकल चाचणीदरम्यान एनएडी+ मध्ये उल्लेखनीय वाढ दिसून आली. त्यामुळे मनुष्यातही याचे चांगले परिणाम दिसतील, अशी आशा आहे.

औषधीच्या वापराने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यात सुधारणा होईल
संशोधनकर्त्यांनी दावा केला की, सैनिकांच्या शरीरात एनएडी+ वाढल्यास त्यांच्या शारीरिक आणि मानसिक फिटनेसमध्ये सुधारणा होईल. वयोमानानुसार जखमा भरून निघण्यातही मदत मिळेल. याशिवाय त्यांच्या पूर्ण करिअरमध्ये कार्यक्षमता घटण्याबाबत निर्माण होणारी चिंताही नसेल. शरीरात या कंपाउंड वाढण्याने मायटोकॉन्ड्रियाचेही (पेशींचे पॉवर हाऊस) पूर्णपणे ओव्हरहॉलिंग होऊन त्या नव्या असल्याप्रमाणे काम करतील. सायंटिफिक अमेरिकन मॅगझिननुसार अनेक अभ्यासांतील निष्कर्षानुसार कंपाउंड वाढल्यास वय वाढल्याचे निदर्शनास येते.

बातम्या आणखी आहेत...