आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलासा:वुहानच्या ज्या प्रयोगशाळेतून काेरोना पसरल्याचा आरोप झाला, तिलाच अमेरिकेने दिले होते संशाेधनासाठी 29 कोटी रुपये

बीजिंग3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • दिव्य मराठी विशेष : कोरोना विषाणू वटवाघळामुळे पसरला की नाही याचा शोध घेत होती अमेरिका
  • अमेरिकन खासदारांकडून निधी देण्यास विरोध

चीनच्या वुहानमध्ये वटवाघळावरील प्रयोगावेळी ज्या प्रयोगशाळेतून कोरोना विषाणूचा संसर्ग जगभरात पसरला तिला अमेरिकी सरकारच्या संस्थेने संशोधनासाठी आर्थिक मदत दिली आहे. डेली मेलने रविवारी वृत्त देत म्हटले आहे की, अमेरिका सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने वुहानच्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीला ३.७ मिलियन डॉलर म्हणजे २९ कोटी रुपयांची मदत दिली आहे. यामुळे कोरोना गुहेत राहणाऱ्या वटवाघळामुळे पसरला होता का? यावर संशोधन सुरू ठेवता येईल. वटवाघळामुळेच कोरोनाचा संसर्ग मानवाच्या शरीरात पसरला, असे शास्त्रज्ञांना वाटते. चीनच्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये वुहानपासून सुमारे एक हजार मैल लांब युनानमधून काही वटवाघूळ पकडून त्यांच्यावर प्रयोग केले जात आहेत. हा प्रयोग सुरू ठेवण्यासाठी अमेरिकेने प्रयोगशाळेला २९ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. कोरोना विषाणूच्या जिनोमवर संशोधन केल्यानंतर शास्त्रज्ञांना आढळले की, सर्वात आधी युनान प्रांतातील गुहेत राहणाऱ्या वटवाघळात विषाणू दिसला. नंतर विषाणू वुहानच्या मांस बाजारात गेला आणि मग त्याचा संसर्ग पूर्ण जगात पसरला. अमेरिकेच्या निधीची माहिती समोर येताच अमेरिकेच्या भूमिकेकडेही संशयाने बघितले जात आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली की, विषाणूचा संसर्ग वुहानच्या मांस बाजारातून नव्हे तर प्रयोगशाळेतून झाला. अमेरिकेची राष्ट्रीय आरोग्य संस्था सरकारी संस्था आहे आणि वुहानच्या प्रयोगशाळेच्या वेबसाइटवर ती संस्था भागीदार कंपनी म्हणून दिसते. आता अमेरिकेतील अनेक दबाव गट चीनच्या प्रयोगशाळेला अमेरिकेच्या निधीवरून टीका करत आहेत. काही अमेरिकन  खासदार आणि दबाव गट सरकारवर यासाठी टीका करत आहेत की, ज्या प्रयोगशाळेत प्राण्यांवर अत्याचार केले जातात, अवैध प्रयोग होतात, तिला अमेरिका आर्थिक मदत का करत आहे?

अशा दुसऱ्या प्रयोगशाळेचीही अमेरिकेला माहिती असेल

अमेरिकेचे रिपब्लिकन खासदार मॅट गेट्झ यांनी सांगितले की,  दुर्दैवाने अमेरिका अनेक वर्षांपासून वुहानच्या त्या प्रयोगशाळेला निधी देत आहे, जेथे प्राण्यांवर अत्याचार केले जातात. अमेरिकेला चीनच्या दुसऱ्या अशा प्रयोगशाळेबाबतही माहिती असावी.

बातम्या आणखी आहेत...