आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • The US Secretary Of State Has Said That Plans To Ban Other Chinese Social Media Apps, Including TikTok, Have Begun

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिनी अ‍ॅप यूएसमध्येही बॅन होणार?:अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हणाले- टिकटॉकसहित चीनच्या इतर सोशल मीडिया अ‍ॅपवर बंदी घालण्याचा विचार सुरु

वॉशिंगटन10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतानंतर आता अमेरिकेतही चायनीज अ‍ॅप बॅन होऊ शकतात. अमेरिकेचे पररराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी याचे संकेत दिले आहेत. सोमवारी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, टिकटॉकसहित चीनच्या इतर सोशल मीडिया अ‍ॅपवर बंदी घालण्याचा विचार सुरु आहे.

चीनशी वाढत्या तणावादरम्यान भारत सरकारने 29 जूनपासून टिकटाॅकसहित 59 चायनीज अ‍ॅपवर बंदी घातली आहे. सरकार म्हणाले, या अ‍ॅप्सद्वारे युजर्सची माहिती गोळा केली जात आहे. ती राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्व व अखंडतेसाठी धोकादायक आहे. भारताचा हा निर्णय योग्य असल्याचे माइक पॉम्पिओ यांनी सांगितले होते.

चीनच्या बाहेर अमेरिका टिकटॉकचा सर्वात मोठा दुसरा बाजार आहे. येथे टिकटॉकचे 4.54 कोटी युजर आहेत. भारतामध्ये 20 कोटी युजर होते आणि चीनच्या बाहेर हे सर्वात मोठे मार्केट होते.

बातम्या आणखी आहेत...