आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनोचा कहर:न्यूयॉर्कमध्ये मृतदेह ठेवण्यासाठी होतोय ट्रक, बस, तंबूंचा वापर; 24 तासांत 1887 जणांचा मृत्यू, एका दिवसात सर्वाधिक मृत्यू 

न्यूयॉर्क / लंडन3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • फूड बँकांबाहेर कारच्या लांब रांगा, ताणात ९ पटीने वाढ

अमेरिकेत कोरोना विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत १५ हजार लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. आता बाधितांची एकूण संख्या ४.३५ लाखांवर पोहोचली आहे. चोवीस तासांत येथे १८८७ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी न्यूयॉर्कमध्ये ७८० जणांचा मृत्यू झाला. काेरोनामुळे एकाच दिवसात सर्वाधिक मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. अमेरिकेत कोरोनाचा मृत्यूदर ३.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या ताज्या अहवालानुसार मृत्यूचे प्रमाण असेच राहिले आहे. १२ एप्रिलला २ हजार २१२ मृत्युमुखी पडले. चार महिन्यांत ६० हजारांहून जास्त मृत्यू होण्याचीही भीती आहे. वास्तविक याआधीच अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कोराेनामुळे किमान १ लाख ते २.४ लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली होती.  न्यूयॉर्क राज्यात एकूण मृत्युमुखी पडलेल्यांपैकी दोन तृतीयांशाहून जास्त मृत न्यूयॉर्कचे आहेत. येथील रुग्णालयांत आता तर जागाही शिल्लक राहिलेली नाही. आता लोकांवर ट्रक व शहरातील किनाऱ्यावर तंबूत उपचार केले जात आहेत. मृतदेहांना बॉडीबॅगमध्ये ठेवून रेफ्रिजरेटेड ट्रकमध्ये ठेवले जात आहे. 

अमेरिका : फूड बँकांबाहेर कारच्या लांब रांगा, ताणात ९ पटीने वाढ

अमेरिकेत लोकांसमोर खाण्यापिण्याचे संकट निर्माण झाले आहे. अनेक शहरांत चॅरिटी फूड बँकांसमोर कारची लांबच लांब रांग दिसते. एनजीआे बेघर लोकांसाठी अन्नाची व्यवस्था करून देत होत्या. राष्ट्रव्यापी संकटाला सावरण्यासाठी ही व्यवस्था नव्हती. येथे कार्यरत मॅनिंग म्हणाले, गेल्या १६ वर्षांपासून येथे काम करतो. यंदा वादळ तसेच पुरामुळे आलेल्या राष्ट्रीय आपत्तीमध्येही काम केले. परंतु आतापर्यंत कधीही अशी परिस्थिती नव्हती. 

ब्रिटन : लॉकडाऊन व सोशल डिस्टन्सिंगमुळे प्रादुर्भाव कमी 

न्यू कोविड-१९ सिम्प्टन ट्रॅकर अॅपच्या डेटाच्या विश्लेषणावरून लॉकडाऊनमुळे आजाराचा प्रादुर्भाव होण्याचा वेग कमी झाल्याचे निष्पन्न झाले. ब्रिटनमध्ये सध्या २० ते ६९ वर्षांच्या १४ लाख लोकांमध्ये काेरोनाची लक्षणे आढळून येतात. एक एप्रिलला १९ लाख लोकांमध्ये लक्षणे दिसली होती. दुसरीकडे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. परंतु, सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे लागू केले असते तर प्रादुर्भाव रोखता आला असता. 

बातम्या आणखी आहेत...