आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान:कमी झोपणाऱ्या पुरुषांवर लसीचा परिणामही कमी

छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरेशी झोप न घेणाऱ्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, हे संशोधकांना फार पूर्वीपासून माहीत आहे. नवीन संशोधनात आढळले की, कमी झोपेमुळे पुरुषांवर लसीचा परिणाम कमी होतो. फ्रेंच नॅशनल हेल्थ इन्स्टिट्यूटच्या कॅरिन स्पीगल व शिकागो विद्यापीठाच्या वेन केटर यांनी १८ ते ६० वर्षे वयोगटातील ६०३ लोकांवर सात अध्ययने केली. त्यांच्या शरीरावर कोविड-१९ लसींच्या परिणामाचे निरीक्षण करण्यात आले. ते रात्री किती तास झोपतात याचीही विचारणा करण्यात आली. अध्ययनात आढळले की, सहा तासांपेक्षा कमी झोपणाऱ्यांमध्ये लसीमुळे जास्त विषाणू-प्रतिरोधक अँटिबाॅडीज तयार झाल्या नाहीत. लस दिल्यानंतर दोन महिन्यांनी कमी झोप घेणाऱ्या पुरुषांमध्ये अँटिबॉडीज कमी होऊ लागल्या. स्पीगल म्हणतात की, हार्मोन्सच्या फरकामुळे स्त्रियांमध्ये असे होत नाही. संशोधक म्हणतात, यावरून हे स्पष्ट झाले की, कोणत्याही लसीचा जास्तीत जास्त परिणाम मिळवण्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...