आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्लामाबाद:बिल गेट्स यांना पाकच्या आरिफ नक्वीकडून 700 काेटी रुपयांचा चुना; पुस्तकातील दावा

इस्लामाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानातील एका ठकाने जगातील चाैथ्या सर्वात श्रीमंत व्यक्ती व मायक्राेसाॅफ्टचे संचालक बिल गेट्स यांची फसवणूक केली हाेती. पाकच्या आरिफ नक्वीने बिल गेट्स यांना ७४१ काेटी रुपयांना ठकवले हाेते. ताे अब्जाधीशांची संपत्ती हडप करत असे. ‘द की मॅन : ट्रु स्टाेरी आॅफ हाऊ द ग्लाेबल एलाइट वाॅज डुप्ड बाय ए कॅपिटलिस्ट फेअरी टेल’ असे पुस्तकाचे नाव आहे. सायमन क्लार्क व विल लाॅफ यांनी हे पुस्तक लिहिले आहे. आरिफ नक्वीने बिल गेट्स यांना १० काेटी डाॅलरला (७४१ काेटी रुपये) ठकवले हाेते, असा उल्लेख त्यात नमूद करण्यात आला.

नक्वी पाकिस्तानच्या खासगी इक्विटी फर्मचा प्रमुख हाेता. ताे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार पैसे गुंतवणूक करताना बिल गेट्स यांच्यासह श्रीमंतांशी चांगले संबंध निर्माण करायचा. त्यातूनच फायदा घेत त्याने बिल गेट्स यांच्याकडून माेठी रक्कम वसूल केली. आरिफ नक्वीने सुमारे ७५० काेटी रुपयांहून जास्त रकमेची हेराफेरी केली हाेती. त्यापैकी निम्म्या रकमेचा काहीही हिशेब ठेवलेला नाही. या प्रकरणात नक्वीला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. कारण एका कर्मचाऱ्याने सगळ्या गुंतवणूकदाराला ई-मेल पाठवून या घाेटाळ्याची माहिती दिली हाेती. अमेरिकेतील सरकारने नक्वीच्या एका कंपनीत अनेक काेटी डाॅलरची गुंतवणूकही केली हाेती.

आरिफला आेबामांचे आमंत्रण
एकेकाळी आरिफ नक्वी खूप लाेकप्रिय हाेता. त्यामुळेच तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष बराक आेबामा यांनी मुस्लिम व्यापारी नेत्यांच्या शिखर संमेलनात त्यालाही निमंत्रण दिले हाेते. नक्वीने आपले वजन वाढवण्यासाठी स्वत: माेठमाेठ्या देणग्याही दिल्या हाेत्या. बिल व मेलिंडा गेट्स यांच्याप्रमाणे आरिफने एक ‘अमन फाउंडेशन’ स्थापन केले हाेते.

बातम्या आणखी आहेत...