आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मंडे पॉझिटिव्ह:इंडोनेशियात काेराेनाच्या काळातही प्लास्टिक कचऱ्यापासून देश वाचवण्यासाठी विजसेन बहिणींची पर्यावरण माेहीम सुरूच!

रिचर्ड सी पॅडाेकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेलाती-इसाबेल 7 वर्षांपासून बालीला प्लास्टिक कचरामुक्त पर्यावरणासाठी झटताहेत

इंडाेनेशियाच्या बाली बेटावर सध्या दाेन मुलींसह शाळकरी मुले, तरुण प्लास्टिक कचरा जमा करताना सहजपणे दिसून येतात. मेलाती व इसाबेल विजसेन अशी दाेन बहिणींची नावे. त्यांनीच इंडाेनेशियाला प्लास्टिक कचरामुक्त करण्याचा संकल्प व माेहीम सुरू केली हाेती.

मेलाती म्हणते, मान्सून येताच समुद्र किनारी माेठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा जमा हाेताे. यावेळी काेराेना संसर्गामुळे तर समस्या आणखी वाढली आहे. घरात राहण्याची सक्ती व डिस्टन्सिंग पाळतानाच सेवेच्या या कामात सक्रिय राहणे आणखीनच कठीण हाेते. मात्र, आता थांबलाे तर वर्षानुवर्षे घेतलेले परिश्रम पाण्यात जातील. काेराेनामुळे सुरक्षेपासून पॅकेजिंगपर्यंत प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकचा वापर वाढला आहे. त्यामुळे आम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागणार आहेत. सध्या लाेकांचा वावर कमी आहे. म्हणूनच प्लास्टिक कचरा हटवण्याचे काम जास्त चांगल्या प्रकारे हाेऊ शकते, असे मेलातीला वाटते. इसाबेल म्हणते, काेराेनामुळे लाॅकडाऊन केल्याने पर्यावरणाला लाभ झाला. विषाणूविराेधात लढाई लढली जात आहे. तशीच वातावरण बदलासाठी करायला हवी, असे आवाहन दाेघी बहिणी करतात. सरकारने पर्यावरणाच्या मुद्यावरही तत्काळ पावले उचलली पाहिजेत. काेराेनाच्या माध्यमातून निसर्गाने सावरण्याचा इशारा दिला. आपल्याला तो समजून वाटचाल करावी लागेल, असे त्यांनी सांगितले.

दावाेसमध्ये प्लास्टिकच्या सिंगल यूज बंदीसाठी आग्रह

मेलातीने जानेवारीत वर्ल्ड इकाॅनाॅमिक फाेरम (दावाेस) येथे पर्यावरणावर आग्रही मत मांडले. प्लास्टिकचा सिंगल यूज हाेऊ नये यासाठी सरकार व कंपन्यांवर दबाव आणावा, असे तिने म्हटले हाेते. पर्यावरणासाठी जगभरात दाेघी बहिणींनी बाय-बाय प्लास्टिक बॅग्जची २०१३ मध्ये सुरुवात केली हाेती. फेब्रुवारीत बालीत सर्वात माेठे स्वच्छता अभियान राबवले हाेते. दाेघींच्या प्रयत्नातून बालीचा चेहराच पालटला आहे.

0