आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिऱ्यांचा शोध:दक्षिण आफ्रिकेत खोदकामाला लागले संपूर्ण गाव, महिलादेखील मागे नाहीत...

पीटरमॅरिट्सबर्ग2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हे छायाचित्र दक्षिण अाफ्रिकेतील क्लाजुलू नताल प्रांताचे आहे. येथे एक हजारांपेक्षा जास्त लोक गेल्या दोन दिवसांपासून हिऱ्याचा शोध घेण्यासाठी क्वालाथी गावात खोदकाम करत आहेत.

सोमवारी मेंढपाळास खोदकाम करताना हिऱ्यासारखे दगड सापडले. हे वृत्त वाऱ्यासारखे गाव व परिसरात पसरले. यानंतर लाेक फावडे व कुदळ घेऊन गाव व परिसरातील भागात खोदकामाला लागले. विशेष म्हणजे काही लोकांना हे दगड सापडलेही. मात्र ते हिरे नाहीत. तज्ज्ञ त्यांना क्वाॅर्ट््झ क्रिस्टल सांगत आहेत. स्थानिकांना वाटते की ही मौल्यवान दगडे त्यांच्या भागाचे नशीब पालटवतील. तर ज्या लोकांना हे दगड सापडले त्यांनी ते दगड ३०० रँडमध्ये (सुमारे १५०० रुपये) विकणे सुरू केले आहे. दरम्यान, राज्य सरकारने लोकांना तेथून हटवणे व परिसराची तपासणी करण्यासाठी पथकही पाठवले आहे.