आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवा विषाणू:जगाला आता ‘डिसीज-एक्स’ या नव्या घातक विषाणूचा धोका, इबोला विषाणूचा शोध लावणाऱ्या डॉक्टरांचा इशारा

कन्सास4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. जीन मॅक्स मुएंब तामफम - Divya Marathi
डॉ. जीन मॅक्स मुएंब तामफम

जगावर कोरोना महामारीचे संकट घोंगावत असतानाच आता ‘डिसीज-एक्स’ या नव्या विषाणूचा संसर्ग होण्याचा इशारा जारी झाला आहे. इबोला या आफ्रिकी विषाणूचा शोध लावणारे डॉ. जीन मॅक्स मुएंब तामफम यांनी हा इशारा जारी केला आहे. डॉ. तामफम यांच्या मते, ‘डिसीज-एक्स’ जास्त घातक आहे. कोरोनाच्या तुलनेत तो जास्त वेगाने पसरतो. त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या इबोलाच्या तुलनेत ५०% ते ९०% पर्यंत जास्त असू शकते. एका अमेरिकी टीव्ही चॅनलच्या चर्चेत डॉ. तामफम म्हणाले, ‘आज आपण एका अशा जगात आहोत, जेथे नवे विषाणू बाहेर येतील. हे विषाणू मानवासाठी धोका ठरतील. भविष्यात येणारी महामारी कोरोना विषाणूपेक्षा जास्त धोकादायक असेल आणि जास्त संहार करणारी असेल.’

कांगोतच महिला रुग्णात ‘डिसीज-एक्स’ची लक्षणे
कांगोच्या इगेंडमध्ये एका महिला रुग्णात तापाची लक्षणे आढळली. तिची इबोला चाचणी झाली. पण ती निगेटिव्ह आली. ती ‘डिसीज-एक्स’ची पहिली रुग्ण असावी, अशी भीती डॉक्टरांना वाटत आहे.

बातम्या आणखी आहेत...