आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॉर्मलसी इंडेक्स:जगभरात आता जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले, ट्रॅकरमध्ये भारत 44 व्या स्थानी

लंडन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळाच्या अगोदर असलेले सामान्य जीवन पुन्हा परतू लागले आहे. ‘द इकॉनॉमिस्ट’ च्या नॉर्मलसी इंडेक्स रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. भारतासह प्रमुख ५० देशांतील पाहणीवर आधारित हा अहवाल आहे. जगातील ९० टक्के जीडीपीचा समावेश असलेल्या देशांचा या पाहणीत समावेश होता. या देशांत जगाची ७६ टक्के लोकसंख्या आहे.

कोरोना काळाच्या आधी व आताच्या जीवनाची तुलना निर्देशांकाच्या (इंडेक्स) आधारे करण्यात आली आहे. त्यासाठी काही स्थितीवर लक्ष देण्यात आले आहे. उदाहरणार्थ- मोठ्या शहरांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, आंतरराष्ट्रीय-देशांतर्गत विमान उड्डाणे किती प्रमाणात सामान्य झाली हे लक्षात घेण्यात आले. मनोरंजन-सिनेमा, व्यावसायिक खेळांची स्थिती, दुकानांतील गर्दी, बाजारातील विक्री किती वाढली? मोठ्या शहरांतील कार्यालयांत कामकाज कोणत्या पातळीवर आहे? लोक घराबाहेर पूर्वीसारखेच पडू लागले आहेत का? इत्यादी निकष त्यात समाविष्ट होते. इंडेक्स गणनेसाठी ट्रॅकरमध्ये कोरोना काळापूर्वी जीवनाला १०० गुणांवर सेट करण्यात आले. त्याच्या आधारे जगभरातील जनजीवनासाठी ६९ गुणांक मिळाले आहेत.

बाजार, घरात न राहणे, सार्वजनिक वाहतूक सुविधा, कार्यालयीन कामकाज यांना ८० वर गुण आहेत. सिनेमा हॉलमधील परिस्थितीदेखील त्यात मोजण्यात आली. भारताचा जनजीवन निर्देशांक ५३.८ राहिला. ट्रॅकरमध्ये भारत ४४ व्या स्थानी राहिला. हाँगकाँग १०१.२ निर्देशांकासह सर्वात उच्चस्थानी आहे. पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे. अमेरिका, चीन किंवा ब्रिटन पहिल्या दहा देशांत नाही. कोरोना काळादरम्यान मार्च २०२० मध्ये जागतिक सामान्य स्थिती निर्देशांक पहिल्यांदा कोसळला होता. त्याचे कारण कडक निर्बंध होते.

बातम्या आणखी आहेत...