आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:जगातील पहिला बायोनिक डोळा, जो लोकांचे अंधत्व दूर करेल; मेंदूत बसवण्याची तयारी

मेलबर्नएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी संशोधन करून बनवले उपकरण

ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातील संशोधकांनी अथक प्रयत्नानंतर बायोनिक डोळा बनवला आहे. याद्वारे लोकांचे अंधत्व दूर होऊ शकेल. याची चाचणी पूर्ण होऊ शकेल. आता हा माणसाच्या मेंदूत बसवण्याची तयारी सुरू आहे. हा जगातील पहिला बायोनिक डोळा असल्याचा दावा करण्यात आला आहे. विद्यापीठाचे इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक लाओरी यांनी सांगितले, आम्ही मेंदूच्या पृष्ठभागावर बसवता येईल अशी वायरलेस ट्रान्समीटर चिप विकसित केली आहे. आम्ही या चिपला बायोनिक आय असे नाव दिले आहे. यात कॅमेऱ्यासह एक हेडगिअर फिट केलेला आहे. जो आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर नजर ठेवू शकेल. या उपकरणाचा आकार ९ बाय ९ मिलिमीटर आहे. हा डोळा बनवण्यासाठी १० वर्षांपेक्षा जास्त काळ लागला आहे. प्रा. लाओरींनुसार, बायोनिक डोळा माणसाचे अंधत्व कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल. जन्मापासून अंध असलेल्या व्यक्तींमध्येही तो लावता येईल. संशोधकांनी हे उपकरण विकण्यासाठी निधीची मागणी केली आहे. या संशोधकांना गतवर्षी एक मिलियन डॉलर (सुमारे ७.३५ कोटी) देण्यात आले होते.

गतवर्षी मेंढ्यांवर झाली चाचणी

मोनाश बोयोमेडिसिन डिस्कव्हरी इन्स्टिट्यूटचे डॉक्टर यान वोंग यांनी सांगितले, संशोधनादरम्यान मेंढ्यांवर चाचणी घेण्यात आली. यात ७ उपकरणे मेंढ्यांना कुठलीही इजा न पोहोचवता ९ महिन्यांपर्यंत सक्रिय होती. दुसरीकडे, डॉ. ल्यूस म्हणाले, हे उपकरण प्र‌भावी ठरल्यास ते मोठ्या प्रमाणात तयार केले जाईल.