आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इंग्लंडमध्ये मंगळवारी कोरोना लसीकरण सुरू झाले. फायझरच्या लसीचा पहिला डोस मार्गारेट कीनन यांना देण्यात आला. त्या पुढील आठवड्यात ९१ वर्षांच्या होतील. पुढील काही दिवसांत इंग्लंडमध्ये ८ लाख लोकांना लस दिली जाईल. लस घेतल्यानंतर कीनन म्हणाल्या, ही वाढदिवसाच्या आधी मिळालेली उत्तम भेट आहे. आता मी ख्रिसमस व नवीन वर्षात कुटुंबासोबत उत्सवात सहभागी होऊ शकते.
कीनन म्हणाल्या- आता ख्रिसमस, नव्या वर्षाच्या उत्साहात सहभागी होईन कीनन ८५ वर्षांच्या होईपर्यंत शोरूममध्ये सहायक, नातवांनी सांगितल्याने निवृत्त सार्वजनिक लसीकरण करणारा इंग्लंड पहिला देश.
सर्वात मोठा प्रश्न...भारतात लस केव्हा?
येत्या १० दिवसांत मंजुरीची शक्यता; याच महिन्यात तीन लसी होतील उपलब्ध
भारतातही लसीची प्रतीक्षा आहे. फायझर, सीरम आणि स्वदेशी भारत बायाेटेक कंपन्यांनी त्यांच्या लसीचा आपत्कालीन वापर करण्यास मंजुरी देण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे (सीडीएससीओ) अर्ज केला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी सांगितले की, लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यासाठी विशेष तरतूद करण्यात येत आहे. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, तीन लस कंपन्यांच्या अर्जावर विषयतज्ज्ञ समितीत चर्चा होईल. ही समिती ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला लस वापरात आणण्याची शिफारस करेल. या प्रक्रियेला दहा दिवस लागू शकतात. सर्व काही व्यवस्थित राहिले तर २० डिसेंबरपर्यंत भारताकडे तीन लसीचे पर्याय असतील. भारताने वेगवेगळ्या कंपन्यांसोबत १६० कोटी डोससाठी करार केले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.