आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक उड्डाण:जगातील पहिली ग्रीन फ्लाइट; विमान उड्डाणात वजन-भोजन नियंत्रणाने कार्बनचे उत्सर्जन घटले

नवी दिल्ली । मुकेश कौशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवामान बदल रोखण्यासाठी जेद्दाह ते माद्रिद यादरम्यानच्या ऐतिहासिक इको-फ्रेंडली विमानातून प्रवास करण्याची संधी अनेक भारतीयांना मिळाली. ग्रीन फ्लाइट म्हणून या विमानाची नाेंद झाली आहे. या उड्डाणासाठी कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी प्रत्येक स्तरावर बारकाईने व्यवस्थापन करण्यात आले होते. त्यात प्रवाशांच्या सामानापासून भोजनापर्यंतची काटेकोर माहिती नाेंदवण्यात आली होती. अशा प्रकारे एकाच उड्डाणातून कार्बन डायऑक्साइडचे ८ ते १० हजार किलो उत्सर्जन कमी करण्यात यश मिळाले.

प्रवाशांना हवामान बदलाच्या संकटापासून वाचवण्यासाठी ग्रीन पाॅइंट्स देण्यात आले. त्याचा उपयोग प्रवाशांना पुढील प्रवासाच्या दृष्टीने होऊ शकेल. प्रत्येक प्रवाशाला प्रवासादरम्यान प्रत्येकी २३ किलो वजनी सामान नेण्याची परवानगी देण्यात आली होती. प्रवासापूर्वीच त्यांना किती सामान आणणार आहात याबद्दल विचारणा करण्यात आली होती. एखाद्या प्रवाशाने सात किलो कमी वजनाचे सामान आणल्यास त्यास ७०० ग्रीन पाॅइंट्स देण्यात आले. दहा तासांच्या प्रवासात ७ किलो वजन कमी झाल्यास कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन ३६ किलोने कमी होते. २०० प्रवाशांनी एवढेच कमी वजनाचे सामान आणल्यास उड्डाणादरम्यान कार्बन उत्सर्जनात ७५०० किलोने घट होते, असे दिसून आले. अशाच प्रकारे भोजनासाठी शाकाहारी किंवा ऑरगॅनिक पदार्थांचा पर्याय निवडल्यास जास्तीत जास्त ग्रीन पाॅइंट्स देण्यात आले.

२०१९ मध्ये ९१.५ कोटी टन कार्बनचे उत्सर्जन
एका घराला उष्ण ठेवण्याएवढ्या कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन सहा तासांच्या एका उड्डाणातून होते. २०१९ मध्ये जगभरात ९१.५ कोटी टन कार्बनचे उत्सर्जन झाले तर जगभरात विविध मानवी घडामाेडींमुळे एका वर्षात एकूण ४३ अब्ज टन कार्बनचे उत्सर्जन झाल्याची नाेंद आहे.

बातम्या आणखी आहेत...